दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

रिसोड पोलिसांचा मोठा पराक्रम! १५ दिवसांत ४ अपहरण गुन्हे उघड, १० जणांची सुखरूप सुटका

Follow Us:
Risod police rescuing missing persons during Operation Muskan in Washim district

रिसोड | वाशीम जिल्हा प्रतिनिधी |२३ फेब्रुवारी २०२६

वाशीम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या
ऑपरेशन मुस्कान मोहिमेत पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. मागील १५ दिवसांत
अपहरणाचे ४ गंभीर गुन्हे उघडकीस आणत बेपत्ता झालेल्या १० नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप
नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील पालक व नागरिकांमध्ये
सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष
मोहिमेत तांत्रिक तपास, CCTV फुटेज विश्लेषण आणि आधुनिक तपास पद्धतींचा प्रभावी वापर करण्यात आला.
अत्यंत क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावत रिसोड पोलिसांनी कमी कालावधीत मोठे यश मिळवले.

निजामपूर येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कर्नाटक राज्यातील मुरगोडा (जि. बेळगाव) येथून ताब्यात घेण्यात आले.
लोणी खुर्द येथील १७ वर्षीय मुलीचा शोध मध्यप्रदेशातील हरदा (जि. खंडवा) येथे लावून तिला सुरक्षित परत आणण्यात आले.
तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शिवाजीनगर येथील १६ वर्षीय मुलगा आणि वडजी येथील १६ वर्षीय मुलीचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

याव्यतिरिक्त परिसरातून बेपत्ता झालेल्या अन्य ६ व्यक्तींचाही शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.

अपर पोलीस अधीक्षक लता फड व सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदिप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई पार पाडली.
या पथकात सपोनि शिवचरण डोंगरे, पोउपनि संजय नंदकुले, ग्रेड पोउपनि वसंत तहकीक व इतर अंमलदारांचा सहभाग होता.

या यशस्वी मोहिमेमुळे रिसोड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून हरवलेले नातेवाईक सुरक्षित परत आल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.


📌 संबंधित बातम्या


👉 आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखलीतील तलाठी पियुष गायकवाड यांच्या आत्महत्येची बातमी

अवघ्या २६ व्या वर्षी जीवनप्रवास थांबला; चिखलीतील तरुण तलाठी पियुष गायकवाड यांची आत्महत्या

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

शिंदी सरकारी एफ-क्लास जमीन प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिंदी सरकारी जमीन प्रकरणात मोठी घडामोड! तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

देऊळगाव राजा बालाजी महाराज मंदिरात मंगळसूत्र चोरीची घटना

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले

साखरखेर्ड्यात भरदिवसा महिलेच्या घरात घुसून गळा दाबण्याचा प्रयत्न; आरडाओरड ऐकून नागरिकांनी आरोपीला पकडले

चिखली पोलिसांनी गुजरातमधील वाकानेर येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील ४० वर्षीय आरोपीला अटक केली

चिखली पोलिसांची गुजरातमध्ये कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील ४० वर्षीय आरोपीला वाकानेरमधून अटक

Leave a comment