हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

हिवरा आश्रमात चोरट्यांचा धुमाकूळ! १२ दिवसांत तिसरी चोरी; दिवसाढवळ्या घरफोडीत ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

On: July 5, 2026 1:43 PM
Follow Us:
हिवरा आश्रम येथे दिवसाढवळ्या घरफोडीत ६५ हजारांचा मुद्देमाल चोरीला; तपासासाठी घटनास्थळी पोलीस, श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ

साखरखेर्डा | समाधान सरकटे

बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, अवघ्या १२ दिवसांत हिवरा आश्रमातील ही तिसरी चोरी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरा आश्रम येथील शेळके लेआउटमध्ये अमोल अरविंद नरवाडे यांचे घर आहे. १ जुलै रोजी दुपारी त्यांच्या आई नातीला शाळेतून आणण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा वाकवून त्यामधील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (अंदाजे किंमत ३० हजार रुपये) तसेच ३५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

या प्रकरणी अमोल अरविंद नरवाडे यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) व ३३१(३) घटनेची माहिती मिळताच बुलढाणा येथील श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथक आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वानाने परिसरात शोध घेतला, मात्र कोणताही ठोस धागादोरा मिळाला नाही. पोलिसांकडून तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कडुबा डोईफोडे पुढील तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच बुलढाणा येथील श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथक आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वानाने परिसरात शोध घेतला, मात्र कोणताही ठोस धागादोरा मिळाला नाही. पोलिसांकडून तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.

दरम्यान, हिवरा आश्रमात सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेच्या निवासस्थानातून सोन्याचा दागिना, चांदीची चैन आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. त्यानंतर गावातील एका नागरिकाची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेली, तर दुसऱ्या घरातून १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती.

या तीन घटनांमध्ये मिळून सुमारे १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांनी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अज्ञात चोरट्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली आहे.

📢 KattaNews.in वाचत राहा

बुलढाणा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्या मिळवण्यासाठी KattaNews.in ला दररोज भेट द्या. ही बातमी आपल्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा.

Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

चिखली भाजप नगरसेवकाची रस्त्याच्या निधीसाठी बॅनरबाजी

‘मी सिमेंट रोड बोलतोय…’; चिखलीत भाजप नगरसेवकाची अनोखी बॅनरबाजी, रस्त्याच्या निधीच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण

बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड

“मुख्यमंत्र्यांच्या नावाने वसुली होतेय?”; “आरोप खोटा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन” बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षात संजय गायकवाडांचा मोठा दावा

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान; सत्य, अहिंसा आणि मूल्यनिष्ठेचा जागर

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव २०२६

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ; २० ऑक्टोबरला दसरा पालखी मिरवणूक

अंढेरा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्याहून हिवरखेडकडे निघाला, पण अंढेरा घाटात काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

Leave a comment