हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अपर आयुक्तांचा धडक आदेश! कलम 39(1) अंतर्गत येवतीच्या सरपंचांना थेट अपात्र घोषित

On: February 12, 2026 1:38 PM
Follow Us:
येवती ग्रामपंचायत सरपंच कलम 39(1) अंतर्गत अपात्र – वाशिम जिल्हा

रिसोड ,वाशिम|१२ फेब्रुवारी २०२६

येवती ग्रामपंचायत, सरपंच अपात्रता, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 39(1) या प्रकरणामुळे वाशिम जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. अपर आयुक्त, अमरावती यांनी दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार सरपंच सौ. योगिता गजानन माळेकर यांना थेट अपात्र घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे त्यांचे सरपंचपद तसेच ग्रामपंचायत सदस्यत्व तात्काळ रद्द झाले असून येवती गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.हे प्रकरण श्रीकृष्ण निलोबा शिंदे (रा. येवती) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सुरू झाले. तक्रारीनुसार ग्रामसभेचा आवश्यक कोरम पूर्ण नसतानाही सभा पार पाडण्यात आली. अनुपस्थित सदस्यांना उपस्थित तसेच ‘सूचक’ म्हणून नोंदविण्यात आले. मासिक बैठकीच्या इतिवृत्तात गैरहजर व्यक्तीचे नाव प्रस्तावक व समर्थक म्हणून नमूद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्यक्षात विहीर न खोदता मजुरी अदा करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. संबंधित हजेरीपत्रकास मान्यता देऊन आर्थिक लाभ मिळवून दिल्याचेही आरोप करण्यात आले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात ग्रामसभेचा कोरम अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. तहकूब सभेची कालमर्यादा पाळली नसल्याचेही निदर्शनास आले. प्रत्यक्षात विहीर अस्तित्वात नसताना हजेरीपत्रकास मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले असून सरपंचांनी कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचे स्पष्ट मत नोंदविण्यात आले.

सुनावणीदरम्यान चौकशी अहवाल त्रिसदस्यीय असल्याने तो अवैध असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र उपलब्ध दस्तऐवज, नोंदी व पुराव्यांचा अभ्यास करून अपर आयुक्तांनी हा युक्तिवाद नामंजूर केला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 39(1) अंतर्गत पदाचा दुरुपयोग व नियमभंग झाल्याचे स्पष्ट झाल्याने सौ. योगिता गजानन माळेकर यांना सरपंच व सदस्य पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले.

या आदेशामुळे येवती ग्रामपंचायतीत राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला जाणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


हे पण वाचा.


👉 स्थानिक, राजकीय आणि विश्वसनीय बातम्यांसाठी kattanews.in नियमित वाचा आणि Follow करा.

 

विजय जुंजारे

विजय जुंजारे हे रिसोड प्रतिनिधी असून वाशिम जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींचे कव्हरेज करतात.त्यांना २ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवतात. त्यांच्या बातम्या वाचकांना विश्वासार्ह आणि नेमकी माहिती देतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Indian Navy Recruitment मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वरोडी येथील शेतकरी कन्या कु. कोमल अनंता गवई हिची भारतीय नौदलात निवड.

Indian Navy Recruitment: बुलढाण्यातील शेतकरी कन्या कोमल गवईची भारतीय नौदलात निवड; मेहनतीने साकारले देशसेवेचे स्वप्न

देऊळगाव राजा तालुक्यातील असोला फाटा येथील नागरे पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या ऋषीकेश गजानन भागीले प्रकरणाचे प्रतिनिधिक छायाचित्र

देऊळगाव राजा : अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत 27 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालक फरार

मोताळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेताची पाहणी करताना आमदार धर्मवीर संजू गायकवाड.

अवकाळी पावसाचा कहर! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार संजू गायकवाड; प्रशासनाला तातडीचे आदेश

Honey Trap Case मध्ये जालना पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील मुख्य सूत्रधार महिलेसह सहा आरोपींना अटक केली.

Honey Trap Case: बुलढाणा जिल्ह्यातील 23 वर्षीय महिला निघाली मुख्य सूत्रधार; सोशल मीडियातून जाळे, लाखोंची खंडणी

मेहकरच्या परतापूर येथे गर्भलिंग निदान प्रकरणात पीसीपीएनडीटी पथकाची कारवाई करताना जप्त केलेले सोनोग्राफी मशीन

घरात सुरू होता गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा; पीसीपीएनडीटी पथकाची धाड, बोगस डॉक्टर रंगेहात पकडला

महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकाऱ्याला दिव्यांग मुलीच्या अर्थसाह्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने अटक केली

दिव्यांग मुलीच्या अर्थसाह्यासाठी लाच! महिला व बालविकास विभागाचा संरक्षण अधिकारी रंगेहात अटकेत

Leave a Comment