हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

On: July 11, 2026 3:37 PM
Follow Us:
अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर ,प्रतिनिधी|विशाल गवई 

बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर पोलीस स्टेशनने अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई करत डोंगरशेवली शिवारातील जंगल परिसरात सुरू असलेला हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत दोन महिलांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हातभट्टी दारू, साहित्य आणि सडावा नष्ट करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस स्टेशन अमडापूरला डोंगरशेवली शिवारातील दरी-खोऱ्यात जंगलामध्ये अवैध हातभट्टी दारू गाळण्याचे काम सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार जयसिंग राजपूत यांनी तात्काळ विशेष पथकासह घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, तयार दारू तसेच सडावा आढळून आला. यानंतर संपूर्ण अड्डा उद्ध्वस्त करून अवैध दारू आणि सडावा जागीच नष्ट करण्यात आला.

कारवाईदरम्यान रेखाबाई सुनील पवार (रा. डोंगरखंडाळा, ता. चिखली) यांच्या ताब्यातून १४ लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा सुमारे ३,४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मंगलाबाई गणेश पवार (रा. डोंगरखंडाळा, ता. चिखली) यांच्या ताब्यातून १४ लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा सुमारे ३,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी जप्त केलेली हातभट्टी दारू आणि सडावा नियमानुसार नष्ट केला.

या प्रकरणी दोन्ही महिला आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास एएसआय निवृत्ती चेके करीत आहेत.

ही कारवाई अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत एएसआय निवृत्ती चेके, पोलीस हवालदार बिलगे, पोलीस शिपाई चंद्रशेखर मुरडकर, दुर्गासिंग ठाकूर, रंजीत सरोदे, चालक चिंचोले तसेच महिला अंमलदार वैशाली आराख यांनी सहभाग घेतला. अवैध व्यवसायांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

📢 KattaNews.in ला फॉलो करा

बुलढाणासह महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, गुन्हे, शेती, सरकारी योजना, राजकारण, रोजगार आणि स्थानिक घडामोडींचे सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह अपडेट्स मिळवण्यासाठी KattaNews.in नियमित वाचा.

संबंधित बातम्या

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रम

देऊळगाव राजा : श्री व्यंकटेश महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

चिखली तहसील कार्यालयात रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी ₹100 घेतल्याची तक्रार

चिखलीत रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी ₹100? तहसील कार्यालयातील तक्रारीने खळबळ; चौकशीची मागणी

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील SIR मतदार पडताळणी अभियान

Sindkhed Raja News: 3 लाख 11 हजार मतदारांची पडताळणी पूर्ण; मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांचा आकडा समोर

चिखली तहसील कार्यालयासमोर निकृष्ट रेशनचा तांदूळ ओतताना नागरिक

“या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका-पोरांसोबत खावी!” चिखलीत संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयासमोरच ओतला रेशनचा तांदूळ

साखरखेर्डा येथे कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करण्याचे पोलिसांचे आवाहन

कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करा; साखरखेर्डा येथे पोलीस अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

Buldhana News जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय

Buldhana News: बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत ‘सहकार’चा चौकार! ७ पैकी ५ जागा जिंकल्या; डॉ. राजेंद्र शिंगणे ठरले किंगमेकर?

Leave a Comment