हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्ड्यात सरकारी ई-क्लास जमिनीवर डल्ला? क्रीडांगण नांगरून ताबा घेण्याचा प्रयत्न; युवक संतप्त

On: July 11, 2026 9:35 AM
Follow Us:
साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास क्रीडांगणाच्या जमिनीवर जमलेले युवक
साखरखेर्डा | समाधान सरकटे  

 

साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास जमिनीवर कथित अतिक्रमणाचा प्रयत्न झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांसाठी उपयोगात असलेल्या क्रीडांगणाची जमीन रात्रीच्या वेळी नांगरून ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर शेकडो युवकांनी घटनास्थळी धाव घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून ही जमीन कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्याचा ठाम आग्रह धरला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जमीन मोजणीत कथित फेरफार करून संबंधित जमीन खासगी मालकीची असल्याचा भास निर्माण करण्यात आला. त्यानंतर रात्रीच्या वेळी क्रीडांगणावर नांगर फिरवून सरकारी जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर गावातील युवक, नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.

संतप्त नागरिकांनी तहसीलदार अजित दिवटे आणि साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांना निवेदन देत सरकारी जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

गट क्रमांक ८७० मधील सुमारे ९ हेक्टर ६२ आर क्षेत्रापैकी १ हेक्टर ६२ आर जमीन अनेक वर्षांपूर्वी साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. गेल्या जवळपास पन्नास वर्षांपासून या ठिकाणी भव्य क्रीडांगण तयार करण्यात आले असून शाळेतील विद्यार्थी, गावातील युवक तसेच ज्येष्ठ नागरिक नियमितपणे या मैदानाचा वापर करत होते.

दरम्यान, संबंधित संस्था जमीन वापरत नसल्याचे आणि भाडेही भरले जात नसल्याच्या कारणावरून महसूल विभागाने ३० जानेवारी २०२५ रोजी ही जमीन पुन्हा शासन ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर या परिसरातील काही जमिनींच्या वर्गवारीत फेरफार झाल्याचे आरोप होत असून, भूखंड तयार करून विक्रीचे प्रकार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सरकारी ई-क्लास जमीन ही भूमिहीन आणि सार्वजनिक हितासाठी असताना काही भू-माफिया लाखोंच्या व्यवहारातून अशा जमिनींवर ताबा मिळवत असल्याचा गंभीर आरोप संतप्त युवकांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर, शिंदे सेनेचे गोपाल राजपूत, संतोष राजपूत, श्याम खरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस विशाल गवई यांच्यासह शेकडो युवकांनी प्रशासनाला निवेदन देत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर यांनी हे प्रकरण विधानमंडळात मांडण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही याबाबत माहिती देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, साखरखेर्डा ग्रामपंचायतीने संबंधित जमीन कायमस्वरूपी सार्वजनिक क्रीडांगण म्हणून राखीव ठेवण्याचा ठराव तहसीलदारांकडे सादर केला असल्याची माहिती सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांनी दिली. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महसूल विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, असे मत ठाणेदार युवराज रबडे यांनी व्यक्त केले आहे.

सरकारी ताब्यातील या ई-क्लास जमिनीबाबत प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, अतिक्रमणाचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होते का आणि क्रीडांगण कायम राखले जाते का, याकडे आता संपूर्ण साखरखेर्डा परिसरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

📢 KattaNews.in वर सर्वात आधी वाचा

बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्या वाचण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

🔴 संबंधित बातम्या

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रम

देऊळगाव राजा : श्री व्यंकटेश महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

चिखली तहसील कार्यालयात रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी ₹100 घेतल्याची तक्रार

चिखलीत रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी ₹100? तहसील कार्यालयातील तक्रारीने खळबळ; चौकशीची मागणी

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील SIR मतदार पडताळणी अभियान

Sindkhed Raja News: 3 लाख 11 हजार मतदारांची पडताळणी पूर्ण; मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांचा आकडा समोर

चिखली तहसील कार्यालयासमोर निकृष्ट रेशनचा तांदूळ ओतताना नागरिक

“या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका-पोरांसोबत खावी!” चिखलीत संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयासमोरच ओतला रेशनचा तांदूळ

साखरखेर्डा येथे कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करण्याचे पोलिसांचे आवाहन

कावड यात्रा आणि ईद मिलाद शांततेत साजरे करा; साखरखेर्डा येथे पोलीस अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

Buldhana News जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय

Buldhana News: बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत ‘सहकार’चा चौकार! ७ पैकी ५ जागा जिंकल्या; डॉ. राजेंद्र शिंगणे ठरले किंगमेकर?

Leave a Comment