हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

गुलाब शेतीत घडवली यशोगाथा! आंबेवाडीच्या सुनिता आव्हाड यांना राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार

On: July 5, 2026 9:46 AM
Follow Us:
राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार स्वीकारताना आंबेवाडीच्या सुनिता भानुदास आव्हाड

साखरखेर्डा ,प्रतिनिधी |समाधान सरकटे 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगतिशील महिला शेतकरी सौ. सुनिता भानुदास आव्हाड यांनी गुलाब शेतीत उल्लेखनीय यश संपादन करत आर्थिक प्रगतीचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कृषी विभागाच्या वतीने त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

सुनिता आव्हाड आणि त्यांचे पती भानुदास आव्हाड यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत एक हेक्टर क्षेत्रावर गुलाबाची लागवड केली आहे. याशिवाय २० गुंठ्यांत झेंडू आणि २० गुंठ्यांत विविध फुलपिकांची लागवड करून त्यांनी शेतीत उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण केले आहेत. नियोजनबद्ध शेती, आधुनिक सिंचन पद्धती आणि दर्जेदार उत्पादनामुळे त्यांच्या फुलशेतीला विशेष ओळख मिळाली आहे.गुलाब शेतीत सातत्य, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून त्यांनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या यशामुळे महिला शेतकऱ्यांमध्ये आधुनिक फुलशेतीबाबत नवीन आत्मविश्वास निर्माण झाला असल्याची भावना कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी संतोष ठोंबरे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अमोल झाने, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखाधिकारी प्रकाश राठोड, जिल्हा कृषी अधिकारी धिरज वाकोडे, कृषी अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत आणि मोहीम अधिकारी प्रमोद गायके यांची प्रमुख उपस्थिती होती.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

मान्यवरांच्या हस्ते सुनिता आव्हाड यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे आंबेवाडी गावासह संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


हे पण वाचा..


वाचकांसाठी आवाहन

अशाच शेती, ग्रामीण, कृषी, रोजगार, सरकारी योजना आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७ अंतर्गत सिंदखेडराजा येथे आयोजित जनजागृती अभियानातील पदाधिकारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रणशिंग; मिशन-२०२७ जनजागृती अभियानाला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

Leave a Comment