हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! MahaDBT वर अर्ज सुरू; विविध योजनांवर ५०% पर्यंत अनुदान

On: July 1, 2026 2:20 PM
Follow Us:
MahaDBT वर अर्ज सुरू; अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांसाठी ५०% पर्यंत अनुदान

बुलढाणा |समाधान सरकटे 

राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांकडून MahaDBT पोर्टलवर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध फलोत्पादन, संरक्षित शेती, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, मधुमक्षिका पालन, साठवणूक आणि प्रक्रिया प्रकल्पांसह एकूण २९ घटकांसाठी शासनाकडून ४० ते ५० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे.

या योजनेअंतर्गत फळबाग लागवड, ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, केळी, पपई, अवोकॅडो, फुलशेती, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती, रोपवाटिका, मशरूम उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, वैयक्तिक व सामूहिक शेततळे, हरीतगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, तण नियंत्रण अच्छादन, मधुमक्षिका पालन, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, विविध स्प्रेअर, फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र तसेच कमी खर्चाचे कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह अशा अनेक घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना ४० ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार असून काही घटकांसाठी प्रतियुनिट किंवा प्रतिहेक्टर लाखो रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अंतिम अनुदानाची रक्कम शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार मंजूर केली जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी MahaDBT पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाची निवड ‘प्रथम अर्ज, प्रथम लाभ’ या तत्त्वावर केली जाणार आहे. अर्ज करताना लाभार्थ्याकडे अनुसूचित जातीचे वैध जात प्रमाणपत्र तसेच Farmer ID असणे बंधनकारक आहे.

लाभार्थ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. पाहणी समाधानकारक झाल्यानंतर मंजूर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. संबंधित घटकासाठी यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


महत्त्वाच्या बाबी

  • ✅ MahaDBT वर ऑनलाइन अर्ज सुरू
  • ✅ अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांसाठी योजना
  • ✅ २९ विविध कृषी घटकांचा समावेश
  • ✅ ४०% ते ५०% पर्यंत अनुदान
  • ✅ प्रथम अर्ज, प्रथम लाभ तत्त्व
  • ✅ Farmer ID आणि जात प्रमाणपत्र आवश्यक

हे ‌नककी करा..‌

शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा. कृषी, शासन योजना आणि ब्रेकिंग अपडेट्ससाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.


Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

चिखली भाजप नगरसेवकाची रस्त्याच्या निधीसाठी बॅनरबाजी

‘मी सिमेंट रोड बोलतोय…’; चिखलीत भाजप नगरसेवकाची अनोखी बॅनरबाजी, रस्त्याच्या निधीच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण

बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड

“मुख्यमंत्र्यांच्या नावाने वसुली होतेय?”; “आरोप खोटा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन” बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षात संजय गायकवाडांचा मोठा दावा

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान; सत्य, अहिंसा आणि मूल्यनिष्ठेचा जागर

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव २०२६

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ; २० ऑक्टोबरला दसरा पालखी मिरवणूक

अंढेरा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्याहून हिवरखेडकडे निघाला, पण अंढेरा घाटात काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

Leave a comment