हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात बेकायदेशीर जैव उत्तेजक खतांचा साठा; ‘कृषी मित्र’ भरतीवर फसवणुकीचा गंभीर आरोप

On: June 30, 2026 2:27 PM
Follow Us:
बुलढाणा येथील डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात बेकायदेशीर जैव उत्तेजक खतांचा साठा जप्त करताना कृषी विभागाचे अधिकारी

बुलढाणा,प्रतिनिधी|विशाल गवई 

बुलढाणा जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. जिथे भविष्यातील कृषी तज्ज्ञ घडवले जातात, त्याच डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात बेकायदेशीर जैव उत्तेजक खतांचा मोठा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे.

‘कृषी मित्र’ भरती परीक्षेच्या नावाखाली परीक्षार्थींना विनापरवाना जैव उत्तेजक उत्पादने वितरित केली जात असल्याचा गंभीर प्रकार कृषी विभागाच्या छाप्यात उघडकीस आला आहे.

२८ जून रोजी तालुका कृषी अधिकारी भास्कर राहाणे यांच्या पथकाने अचानक महाविद्यालयाच्या सभागृहात छापा टाकला. त्यावेळी सुरू असलेल्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली.

छाप्यात “क्रॉप बूस्टर” नावाचे जैव उत्तेजक उत्पादन कोणत्याही वैध परवान्याशिवाय वितरित होत असल्याचे समोर आले. घटनास्थळावरून हिंदुस्तान अॅग-टेक बायोटेक प्रा. लि. कंपनीचे ८ मोठे बॉक्स जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ५३ हजार ६०० रुपये इतकी आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, कारवाईपूर्वीच सुमारे ८० पाकिटे परीक्षार्थींना वितरित करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार केवळ साठा नव्हे तर वितरण स्तरावरही झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात कंपनी संचालक दत्ता पांडुरंग जाधव यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर खत नियंत्रण आदेश १९८५ तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धारकरी करीत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. भरती प्रक्रियेच्या नावाखाली एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खतांचा साठा कसा आला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये आर्थिक साटेलोट्याची शक्यता असल्याचीही चर्चा सुरू आहे, मात्र याबाबत कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही.

या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी शिक्षण संस्थांवरील विश्वासाला धक्का बसला असून कठोर चौकशीची मागणी जोर धरत आहे.


📢 वाचकांसाठी: अशाच ताज्या, स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी शेअर करून जनजागृती करा.

हे आवश्यक करा 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

चिखली भाजप नगरसेवकाची रस्त्याच्या निधीसाठी बॅनरबाजी

‘मी सिमेंट रोड बोलतोय…’; चिखलीत भाजप नगरसेवकाची अनोखी बॅनरबाजी, रस्त्याच्या निधीच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण

बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड

“मुख्यमंत्र्यांच्या नावाने वसुली होतेय?”; “आरोप खोटा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन” बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षात संजय गायकवाडांचा मोठा दावा

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान; सत्य, अहिंसा आणि मूल्यनिष्ठेचा जागर

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव २०२६

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ; २० ऑक्टोबरला दसरा पालखी मिरवणूक

अंढेरा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्याहून हिवरखेडकडे निघाला, पण अंढेरा घाटात काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

Leave a comment