KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

साखरखेर्ड्यात पाणीपुरवठा योजनेला गळतीचे ग्रहण; दररोज हजारो लिटर पाणी वाया, ग्रामपंचायत लक्ष देणार का?

On: October 20, 2026 12:59 PM
Follow Us:
साखरखेर्डा गावातील पाणीपुरवठा पाइपलाइनवरील व्हॉल्व्हमधून वाया जाणारे पाणी
साखरखेर्डा | समाधान सरकटे  

एकीकडे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज व्यक्त होत असताना दुसरीकडे साखरखेर्डा गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन आणि व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक ठिकाणी होणारी गळती, उघड्यावरून जाणारी पाइपलाइन आणि घरगुती नळांना तोट्या नसल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देऊन गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

साखरखेर्डा गावातील पाणीपुरवठा योजना १९७५ मध्ये सुरू झाली. सुरुवातीला भोगावती नदीजवळील विहिरीतून पाणी घेऊन गावाला पुरवठा केला जात होता. मात्र, कालांतराने गावाची लोकसंख्या वाढली आणि उन्हाळ्यात या विहिरीतून पुरेसे पाणी उपलब्ध होणे कठीण झाले. त्यामुळे महालक्ष्मी तलावाच्या पायथ्याशी दुसरी विहीर घेण्यात आली.

१९९६ मध्ये दुष्काळ पडल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागली होती. त्यानंतर कोराडी धरणावरून कायमस्वरूपी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. सुमारे दोन वर्षांत या योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, कालांतराने पाइपलाइनवरील गळती वाढत गेल्याने या योजनेच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला.

२०१७ मध्ये या मार्गावरील पाइपलाइन बदलून लोखंडी पाइप टाकण्यात आले. सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या या पाइपलाइनवर १० एअर व्हॉल्व्ह आहेत. त्यापैकी काही बंद असल्याचे, तर काही ठिकाणी व्हॉल्व्हमधून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेतील गळतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये जलकुंभाकडे पाणी नेणाऱ्या पाइपलाइनवरील एका एअर व्हॉल्व्हला दोन दिशांनी नळ जोडलेले असून त्यातून सतत पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिलेल्या माहितीनुसार, सात मिनिटांत सुमारे २०० लिटर पाणी वाया जाते. हा वेग कायम राहिल्यास एका तासात सुमारे १,७१४ लिटर आणि २४ तासांत जवळपास ४१ हजार १४३ लिटर पाणी वाया जाऊ शकते.

याच पाइपलाइनच्या मार्गावर सांडवा नाल्याजवळ पाइप उघड्यावर असल्याने तेथेही पाण्याची गळती होत असल्याची माहिती आहे. गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेत १०० हून अधिक व्हॉल्व्ह आहेत. त्यापैकी काही ठिकाणी गळती होत असून म्हसोबा चौकातील व्हॉल्व्हचीही अशीच परिस्थिती असल्याचे सांगण्यात येते. काही व्हॉल्व्ह बंद असल्यामुळे संबंधित भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे.

घरगुती नळांना तोट्या नसल्याने रस्त्यावर वाहते पाणी

साखरखेर्डा गावात अनेक घरांतील नळांना तोट्या नसल्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र दिसते. पाण्याची उपलब्धता आणि त्याचा योग्य वापर या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. सार्वजनिक पाइपलाइनवरील गळती दुरुस्त करण्याबरोबरच घरगुती नळांना तोट्या बसवण्याबाबतही जनजागृती होणे आवश्यक आहे.

गावात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन जलकुंभ प्रत्येकी ३ लाख ५० हजार लिटर क्षमतेचे, तर तिसरा जलकुंभ २ लाख लिटर क्षमतेचा आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तिन्ही जलकुंभ एकाच दिवशी पूर्ण क्षमतेने भरले जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक त्रुटी तपासून त्यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सध्या महालक्ष्मी तलावात सुमारे ५० टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अधिक महत्त्वाचे ठरते. पाइपलाइनवरील गळती दुरुस्त करणे, बंद व्हॉल्व्ह सुरू करणे आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी यंत्रणेची तपासणी करणे आवश्यक आहे.

साखरखेर्ड्यातील पाणीपुरवठा योजनेची दखल घेऊन गळती असलेले व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत, बंद व्हॉल्व्ह सुरू करावेत आणि पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य मदनलाल जैस्वाल यांनी केली आहे. आता ग्रामपंचायत प्रशासन या समस्येकडे लक्ष देऊन नेमक्या कोणत्या उपाययोजना करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

📢 साखरखेर्ड्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!

आपल्या गावातील आणि परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, स्थानिक प्रश्न, शेती, बाजारभाव आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी कट्टा न्यूजच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

Join WhatsApp Group ✅

💬 आपले मत मांडा

साखरखेर्ड्यातील पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने कोणती पावले उचलावीत? आपल्या परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या किंवा यासंबंधीची माहिती कमेंटमध्ये सांगा. ही बातमी आपल्या गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.

📰 हेही वाचा

▪ ‘१२ वर्षांत शिक्षक आमदारांनी काय केले?’ संस्थाचालकांचा थेट सवाल; ‘साडी-पाकिटासाठी मते विकू नका’, शिक्षक मतदारांना स्पष्ट संदेश

▪ बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

चिखलीहून देऊळगाव राजाकडे येताना काळाचा घाला; उंबरखेड फाट्याजवळ अपघातात २४ वर्षीय वैष्णवी घुगे यांचा मृत्यू

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराजांच्या लाटामंडपोत्सवात २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी

देऊळगाव राजात ‘लक्ष्मी रमण गोविंदा’चा जयघोष! २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी; बालाजींच्या लाटामंडपोत्सवाला सुरुवात

मुख्याध्यापक अरुण शंकर झनके सर यांची तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या सेवाकार्याचा गौरव! मुख्याध्यापक अरुण झनके सर यांना तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार

शिक्षक आमदारांच्या १२ वर्षांच्या कामाचा हिशेब आणि साडी-पाकिटासाठी मते विकू नका असे संस्थाचालकांचे आवाहन

‘१२ वर्षांत शिक्षक आमदारांनी काय केले?’ संस्थाचालकांचा थेट सवाल; ‘साडी-पाकिटासाठी मते विकू नका’, शिक्षक मतदारांना स्पष्ट संदेश

उंबरखेड फाट्याजवळ कार अपघातात वैष्णवी घुगे यांचा मृत्यू

चिखलीहून देऊळगाव राजाकडे येताना काळाचा घाला; उंबरखेड फाट्याजवळ अपघातात २४ वर्षीय वैष्णवी घुगे यांचा मृत्यू

अर्जुन इंगळे यांच्या ३४ वर्षांच्या नगरपालिका सेवाकाळाबाबत आणि बदली अहवालावरून उपस्थित झालेल्या प्रश्नांवरील बातमीचे थंबनेल.

३४ वर्षे एकाच नगरपालिकेत नोकरी, बदलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल; नगरविकास विभागाच्या भूमिकेवर सवाल

श्री बालाजी महाराज यात्रा निमित्त देऊळगाव राजा नगरपरिषद हॉलमध्ये शांतता समितीची बैठक

‘श्री बालाजी महाराज यात्रेला गालबोट लागू देऊ नका’; डॉ. शशिकांत खेडेकर यांचे पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांना निर्देश

Leave a comment