हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
Ladki Bahin Yojana eKYC 2025 : लाडकी बहीण योजना eKYC सुरू, शेवटची तारिसोडमध्ये पोलीस प्रशासनाची भव्य ‘वॉक फॉर युरिसोड एसबीआय बँकेचा रॅम्प वॉक झाला शोभेची वसया आठवड्याचं राशीभविष्य: कोणाला मिळणार यश, कोगोविंदाचं मराठी अभिनेत्रीशी अफेअर? सुनिता अहFake Construction Worker Registration: खामगावात बनावट बांधकाम मजुरां

भोकरदन बसस्थानकावर सुरक्षारक्षकाने वृद्धास केली बेदम मारहाण; 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

On: November 5, 2025 9:42 PM
Follow Us:

भोकरदन,/तालुका प्रतिनिधी संजीव पाटील 

भोकरदन मध्यवर्ती बसस्थानकावर किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षकाने वृद्धावर बेदम मारहाण केली. या घटनेत 60 वर्षीय माजीत खा अन्वरखा यांचा मृत्यू झाला असून, नातेवाईकांनी सुरक्षारक्षकावर खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान माजीत खा अन्वरखा माजीठा, फत्तेपूर येथील, भोकरदन बसस्थानकातील महिला शौचालय कडे गेले होते. त्यावेळी बसस्थानकावरील सुरक्षा रक्षक सुरेश गणपत वनारसे यांनी त्यांच्यावर लाठीने बेदम मारहाण केली.

जखमी वृद्धांना उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल केले गेले, परंतु पुढील उपचारासाठी सिल्लोड नेण्याच्या मार्गावर त्यांचा मृत्यू झाला.

वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर माजीत खा यांच्या नातेवाईकांनी भोकरदन पोलीस ठाण्यात जमा होऊन सुरक्षारक्षकावर खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सुरेश गणपत वनारसे यांना ताब्यात घेतले.

भोकरदन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितिन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रभारी पोलिस निरीक्षक चव्हाण आणि पोलिस उपनिरीक्षक पवन राजपुत तपास करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक पवन राजपुत यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

हे पण वाचा.

भोकरदन तालुक्यात अतिवृष्टीचा कहर! शेतकऱ्यांचे कापूस, मका, सोयाबीन पिके उद्ध्वस्त.

भोकरदन बसस्थानकावरील ही घटना धक्का देणारी असून, सुरक्षा रक्षकावर खुनाचा गुन्हा नोंदवण्याची नातेवाईकांची मागणी आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस तपास यावर लक्ष ठेवत आहेत.

हे पण वाचा.

PM Kisan Yojana 21वा हप्ता : शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये? असा करा Status Check Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!