सिंदखेड राजा, दि. ३० (प्रतिनिधी): आनंदाचा क्षण दु:खात बदलल्याची हृदयद्रावक घटना सिंदखेड राजा तालुक्यात घडली आहे. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या दोन तरुणांचा भरधाव दुचाकी अॅपेवर आदळून भीषण अपघात झाला आणि दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही दुर्घटना मलकापूर पांग्रा येथे दुसरबीड फाट्याजवळील धोकादायक वळणावर ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट मालवाहू अॅपेवर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात रोशन नांदूरकर (वय २९) याचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम पांडुरंग वंजाळे (वय २८) याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दोघेही अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही पुण्याहून बीबी येथे लग्न समारंभासाठी आले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर ते दुचाकीने परत आपल्या गावी निघाले होते. मात्र, मलकापूर पांग्रा गावाजवळील वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली.
या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
📢 तुमच्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी
Kattanews.in ला लगेच follow करा आणि WhatsApp/Telegram वर जोडले जा.
🔗 संबंधित बातम्या
- मध्यरात्री भीषण आग! लोणार तालुक्यातील वढव गावात 7 शेतकऱ्यांचे संसार राख; लोक रस्त्यावर
- ‘त्या’ एका धडकेत संपलं आयुष्य! टिटवी-लोणार रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक; २८ वर्षीय तरुण जागीच ठार
- “खाज असेल तर नागपुरात या!” धीरेंद्र शास्त्रींचं खुलं आव्हान; श्याम मानवांना थेट चॅलेंज














