हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

“किंगमेकर काझींना पुन्हा डावललं!”  समर्थक संतप्त; राष्ट्रवादीत सामूहिक राजीनाम्यांची तयारी

On: May 4, 2026 11:47 AM
Follow Us:
नाझेर काझी राष्ट्रवादी वाद बुलढाणा सिंदखेड राजा राजकीय संकट

सिंदखेड राजा, दि. ३ मे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषद नियुक्त सदस्यांच्या चर्चेत कायम चर्चेत असलेले अॅड. नाझेर काझी यांना यावेळीही संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. बुलढाणा येथे ३० एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे ठाण मांडत संताप व्यक्त केला असून, सामूहिक राजीनाम्यांची तयारी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटन, अल्पसंख्याक समाज आणि स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या काझी यांना यंदा संधी मिळेल, अशी कार्यकर्त्यांची मोठी अपेक्षा होती. माध्यमांमध्येही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अंतिम यादी जाहीर होताच पुन्हा एकदा त्यांचे नाव वगळण्यात आल्याने मोठी निराशा पसरली आहे.विशेष म्हणजे, याआधी वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या उमेदवारीसाठी जोरदार पाठपुरावा केला होता. आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पत्रकारांनीही त्यांच्या नावासाठी बाजू मांडली होती. त्यामुळे यंदा तरी काझींना संधी मिळेल, अशी आशा अधिक बळावली होती. मात्र शेवटच्या क्षणी झालेल्या निर्णयामुळे समर्थकांमध्ये रोष वाढला आहे.सोशल मीडियावरही या नाराजीचा स्फोट दिसून येत आहे. “२६ वर्षे पक्षासाठी झटणाऱ्यांना डावलून नवख्या लोकांना संधी दिली जाते, मग निष्ठेची किंमत कुठे?” असा सवाल करत अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. या प्रतिक्रियांमधून कार्यकर्त्यांचा संताप स्पष्ट दिसून येत आहे.

राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे की, वारंवार चर्चेत येऊनही काझींना प्रत्यक्ष संधी का मिळत नाही? आगामी काळात पक्ष नेतृत्व या नाराजीकडे कसे पाहते आणि यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या १० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून, १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे.


👉 हे पण वाचा..


📢 हे आवश्यक करा

ताज्या आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी आमच्या Kattanews.in ला भेट देत राहा. ही बातमी शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांनी निक्षय मित्र म्हणून टीबी रुग्ण दत्तक घेतल्यावेळी

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा मोठा पुढाकार; सहा महिन्यांसाठी टीबी रुग्ण दत्तक

साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठ आणि श्री प्रल्हाद महाराज संस्थान येथे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त उपस्थित भाविक

साखरखेर्ड्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात; श्री प्रल्हाद महाराज संस्थान व श्री पलसिद्ध महास्वामी मठात हजारो भाविकांची उपस्थिती

बुलढाणा येळगाव धरण 75 टक्के भरले

बुलढाणेकरांसाठी मोठा दिलासा! येळगाव धरण 75% भरले; पाणीटंचाई दूर होण्याची चिन्हे

सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पाऊस

सिंदखेडराजा तालुक्यावर वरुणराजाची दमदार बरसात; शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक १२५.५० मिमी पाऊस

Leave a Comment