हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लग्नाचे आमिष, दोन वर्षे शोषण आणि 5 महिन्यांची गर्भवती… ‘सखी वन स्टॉप सेंटर’मुळे पीडितेला मिळाला न्याय

On: April 23, 2026 8:15 AM
Follow Us:
सखी वन स्टॉप सेंटर बुलढाणा महिलेला न्याय देताना - चिखली क्राईम प्रकरण

चिखली (बुलढाणा) |विशाल गवई 

महाराष्ट्रातील महिला सुरक्षा आणि क्राईम न्यूजमध्ये धक्कादायक ठरणारे एक प्रकरण समोर आले आहे. बारामती तालुक्यातील एका विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे तिचे शोषण करण्यात आले आणि 5 महिन्यांची गरोदर असताना तिला घराबाहेर हाकलण्यात आले. मात्र, सखी वन स्टॉप सेंटर बुलढाणा यांच्या हस्तक्षेपामुळे या पीडित महिलेला अखेर न्याय आणि आधार मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पतीच्या मृत्यूनंतर निराधार झालेली महिला आपल्या माहेरी राहत होती. त्याचदरम्यान चिखली तालुक्यातील एका तरुणाशी तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमप्रकरणात झाले आणि विवाहाचे आश्वासन देत त्या तरुणाने तिला गावाकडे आणले. मात्र, तो आधीपासून विवाहित असल्याची माहिती त्याने लपवून ठेवली.दोन वर्षे संबंध ठेवल्यानंतर आणि पीडित महिला 5 महिन्यांची गरोदर झाल्यानंतर आरोपीच्या पत्नीला हा प्रकार समजताच त्या महिलेला घराबाहेर काढण्यात आले. निराधार अवस्थेत भटकंती करत ती चिखली येथे आली. यावेळी काही स्थानिक महिलांनी मानवतेचा हात पुढे करत तिची मदत केली.वंदना इंगळे, सुषमा जाधव आणि चंद्रकलाबाई गाडेकर यांनी तात्काळ नगरसेवक रत्नदीप यशवंत शिनगारे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांच्या मदतीने सखी वन स्टॉप सेंटरशी संपर्क करण्यात आला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्रप्रशासक आशा बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित महिलेला बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. पाच दिवस तिची वैद्यकीय तपासणी, समुपदेशन आणि कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. सध्या तिला मानवसेवा प्रकल्पांतर्गत सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे.

या प्रकरणात संबंधित आरोपीविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून महिला सुरक्षा आणि न्यायासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत महिला व बाल विकास विभाग, कायदेशीर सल्लागार आणि स्थानिक प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले.

महत्त्वाचे आवाहन: कुठेही निराधार, बेघर किंवा पीडित महिला, वृद्ध व्यक्ती किंवा बालक आढळल्यास तात्काळ 8855850378 किंवा 9689331853 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


👉 Related News


👉 हे आवश्यक करा..

अशा महत्त्वाच्या आणि सत्य घटनांबद्दल अपडेट राहण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी शेअर करा आणि समाजात जागरूकता वाढवा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंप चोरी प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक

बुलढाणा | धाड पेट्रोल पंप चोरीचा अवघ्या काही दिवसांत उलगडा; आरोपी जेरबंद, ₹1.05 लाखांची संपूर्ण रक्कम जप्त

बुलढाण्यात २९ जुलै २०२६ रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आयोजित जिल्हास्तरीय महामोर्चा

२९ जुलैला बुलढाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात जिल्हास्तरीय महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार

खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट बाहेर काढताना मजुराचा मृत्यू; अवैध वाळू उपशाचा संशय

जास्तीच्या मजुरीच्या आमिषाने गेला जीव! खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट काढताना मजुराचा दुर्दैवी मृत्यू; तिघे पोलिसांच्या ताब्यात

बुलढाण्यात धाड पोलिसांनी 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आणि आयशर वाहन जप्त करत मोठी कारवाई केली.

गरीबांच्या ताटातील घास लुटण्याचा प्रयत्न? बुलढाण्यात 41 क्विंटल सरकारी रेशनचा तांदूळ जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

चिखली पोलिसांची मोठी कारवाई, MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध आणि दोघांना तडीपार

चिखली पोलिसांची मोठी कारवाई! MPDA अंतर्गत सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, दोघांना 3 महिन्यांसाठी तडीपार

Leave a Comment