KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

Breaking Crime: पोलीस जावयावर सासू-सासऱ्यांचा हल्ला; बेल्ट-काठीने बेदम मारहाण करत नग्न करण्याचा प्रयत्न

On: April 25, 2026 10:12 AM
Follow Us:
पोलीस जावयावर सासू-सासऱ्यांचा हल्ला, बेल्ट आणि काठीने मारहाण प्रकरण वाशिम

क्राईम न्यूज | Viral Video |

Police Assault Case:महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पोलीस विभागात कार्यरत असलेल्या जावयावर सासू-सासऱ्यांनी भर रस्त्यात बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण करत नग्न करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाने मोठा वळण घेतला असून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा परिसरातील रहिवासी असलेल्या फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, तिचा मुलगा प्रभू चाटे हा पोलीस दलात कार्यरत आहे. त्याचे लग्न वर्षभरापूर्वी वाकडवाडी येथील स्वाती डोंगरे हिच्याशी झाले होते. दोघे मुंबई येथे वास्तव्यास होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

या घटनेनंतर मुलीच्या आत्महत्येचा राग मनात धरून सासू-सासऱ्यांनी जावयाला जबाबदार धरत त्याला गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २१ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजता आरोपी सासू दुर्गा डोंगरे, सासरे वैजीनाथ डोंगरे आणि साळा शुभम डोंगरे हे अंढेरा येथे आले.

त्यानंतर त्यांनी कोणतीही विचारपूस न करता जावई प्रभू चाटे याला पकडून चापटा-बुक्यांनी तसेच बेल्टने बेदम मारहाण सुरू केली. यावेळी काठीनेही डोक्यावर आणि पायावर हल्ला करण्यात आला. इतकेच नव्हे तर, त्याला नग्न करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्रभू चाटे यांनी कसाबसा सुटून पोलीस स्टेशन गाठले. मात्र आरोपी तेथेही पोहोचून त्याला गाडीतून ओढून पुन्हा मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, आरोपी सासूने घरात घुसून तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.


👉 कायद्याची कारवाई

पोलिसांनी आरोपी दुर्गा डोंगरे, वैजीनाथ डोंगरे आणि शुभम डोंगरे यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.


👉 हे पण वाचा..


👉 हे आवश्यक करा..

अशाच Breaking Crime News आणि Viral Updates साठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या.

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

श्री व्यंकटेश महाविद्यालयाचा विद्यार्थी अर्जुन वाघमारे याची दिल्ली दौऱ्यासाठी राज्यस्तरीय चमूत निवड

श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची थेट दिल्लीपर्यंत मजल; अर्जुन वाघमारेंची राज्यस्तरीय ११ सदस्यीय चमूत निवड

दिवाळीपूर्वी ₹5,000 मदत मिळणार असल्याने दुष्काळग्रस्त शेतकरी शेतात उभा

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹5,000 मदत मिळणार ? 33% नुकसानाची अट आणि मदतीबाबत महत्त्वाची अपडेट

बुलढाणा जिल्ह्यात FFS प्रणालीद्वारे मोबाईलवर खत बुकिंग आणि QR कोडने खत खरेदी

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! बुलढाण्यात आता मोबाईलवर खत बुकिंग, ‘FFS’ प्रणालीद्वारे QR कोड दाखवून मिळणार अनुदानित खत

डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत

डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा! “फ्रीस्टाईल” मारामारीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठी कारवाई

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी निलंबन आणि बसस्थानक अतिक्रमण प्रकरण

डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी विजय दांडगे निलंबित! बसस्थानकावरील अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत.

आदिवासी आश्रमशाळांतील पोषण आहारातील अनियमिततेबाबत निवेदन

आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या ताटातून दूध, अंडी-केळी गायब? पोषण आहारातील अनियमिततेवर प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम!

Leave a comment