हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Breaking: पिंपळगाव उंडा येथे हार्वेस्टर ऑपरेटरचा खून — 7 तासांत पोलिसांची मोठी कारवाई

On: May 4, 2026 2:44 PM
Follow Us:
पिंपळगाव उंडा खून प्रकरण साखरखेर्डा पोलिस तपास आरोपी अटक

साखरखेर्डा | समाधान सरकटे 

महाराष्ट्रातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळगाव उंडा येथे घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यू वाटणाऱ्या या प्रकरणाने अचानक मोठा ट्विस्ट घेतला आणि पोलिसांच्या सखोल तपासात हा मृत्यू नसून थेट खून असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे अवघ्या सात तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे, त्यामुळे या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही घटना 29 एप्रिलच्या रात्रीची असून पंजाब राज्यातील हरिदर सिंग इद्रजीत सिंग (वय 43) हा हार्वेस्टर मशीन ऑपरेटर पिंपळगाव उंडा येथे मुक्कामी होता. सकाळी तो मृत अवस्थेत आढळून आला. सुरुवातीला हा प्रकार अकस्मात मृत्यू असल्याचे वाटले आणि त्यानुसार नोंदही करण्यात आली होती. मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मृताच्या डोक्यावर गंभीर जखमा दिसल्याने संशय निर्माण झाला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

ठाणेदार गजानन करेवाड यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी सुरू केली आणि सात संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसांनी कसून तपास करत माहिती गोळा केली. या तपासात एक आरोपी फरार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवत फरार आरोपी बबलीसिंग करणसिंग (वय 34, पंजाब) याला अटक केली.

चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली. आई-बहिणीवर शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्याने लोखंडी सळईने डोक्यावर वार करत खून केल्याचे सांगितले. घटनेनंतर संशय येऊ नये म्हणून मृताच्या कानावर मोबाईल ठेवून आरोपी फरार झाला होता. मात्र तांत्रिक तपास आणि पोलिसी चौकशीमुळे अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मृत व्यक्तीने जखमी अवस्थेत रात्री मालकाला दोन वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तो तडफडत मृत्यूमुखी पडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मृतदेह मेहकर येथे शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून मृताच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. कुटुंब आल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.

साखरखेर्डा पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.


👉 हे पण वाचा..


👉 हे आवश्यक करा 

अशाच ब्रेकिंग आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या. आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि सर्व अपडेट्स सर्वात आधी मिळवा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment