हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्का लागला आणि खून झाला! खामगावात DJ समोर २२ वर्षीय तरुणाची हत्या; ३ आरोपी अटकेत

On: April 27, 2026 8:43 AM
Follow Us:
खामगाव DJ मर्डर केस, लग्नातील वादातून तरुणाचा खून, पोलिस तपास

खामगाव|विशाल गवई 

खामगाव (Breaking Crime News): आनंदाच्या लग्न समारंभात अचानक उसळलेल्या वादाने भीषण वळण घेत २२ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. DJ समोर नाचताना लागलेल्या किरकोळ धक्क्यावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच रक्तरंजित हल्ल्यात बदलला आणि या घटनेने संपूर्ण खामगाव हादरले आहे. ही घटना २५ एप्रिलच्या रात्री बर्डे प्लॉट परिसरात घडली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बर्डे प्लॉट भागात लग्न समारंभात DJ सुरू होता. यावेळी शोएब खान अमीर खान (वय २२) हा आपल्या मित्रांसोबत नाचत होता. याच दरम्यान शेख आफताब, फैजान खान, शेख तालीम आणि अकोल्यातील शेख रफिक यांच्यासोबत किरकोळ धक्का लागल्यामुळे वाद निर्माण झाला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

सुरुवातीला शाब्दिक वाद असलेला हा प्रकार काही वेळातच गंभीर मारहाणीत बदलला. आरोपींनी संगनमत करून चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत शोएब खान याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाजीनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून डीबी पथकाने तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

एका क्षणाच्या रागामुळे एका तरुणाचा जीव गेला — ही घटना समाजासाठी मोठा इशारा ठरत आहे.


👉 हे पण वाचा…


📢 हे आवश्यक करा..

तुमच्या भागातील अशाच Breaking Crime News, Exclusive अपडेट्स आणि Viral बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी Kattanews.in ला Follow करा.

👉 WhatsApp / Telegram वर शेअर करा आणि इतरांनाही माहिती द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment