हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बहिणीच्या वाढदिवशीच शिंदीतील 27 वर्षीय धीरज गवईचा पवना डॅममध्ये बुडून मृत्यू

On: April 26, 2026 7:20 PM
Follow Us:
बुलढाण्यातील शिंदी गावचा तरुण पवना डॅममध्ये बुडून मृत

बुलढाणा : समाधान सरकटे

बुलढाणा जिल्ह्यातील शिंदी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुण्याजवळील पवना डॅममध्ये पोहायला गेलेल्या 27 वर्षीय धीरज गवई यांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उष्णतेत थोडा दिलासा मिळावा म्हणून पाण्यात उतरलेला हा तरुण पुन्हा वरच आला नाही. विशेष म्हणजे, ही घटना त्याच्या बहिणीच्या वाढदिवशीच घडल्याने संपूर्ण साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धीरज गवई हे गेल्या दीड वर्षांपासून आपल्या आई-वडिलांसह पुणे परिसरात कामानिमित्त वास्तव्यास होते. 24 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ते गावातील एका मित्रासोबत पवना डॅम परिसरात गेले होते.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

धीरजला पोहण्याची आवड होती. गावात असताना तो नियमितपणे विहिरीमध्ये मित्रांसोबत पोहत असे. त्यामुळे त्याला पोहण्यात चांगला अनुभव होता. मात्र, डॅममधील खोल पाण्याचा अंदाज चुकला आणि काही वेळातच तो खोल भागात गेला.

काठावर उभ्या असलेल्या मित्राला धीरज बराच वेळ दिसत नसल्याने त्याने तातडीने आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना कळवण्यात आले. काही तासांच्या शोधानंतर रेस्क्यू टीमने धीरजचा मृतदेह बाहेर काढला.

ही बातमी कुटुंबापर्यंत पोहोचताच आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. त्याच दिवशी धीरजने आपल्या लहान बहिणीच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवले होते. काही तासांतच आनंद दुःखात बदलला.

धीरज हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. शिक्षण पूर्ण करून तो सामाजिक कामातही सक्रिय होता. गावात त्याची ओळख मदतीला धावून जाणारा, सर्वांचा लाडका तरुण अशी होती. त्यामुळे त्याच्या निधनाने शिंदीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

25 एप्रिल रोजी सकाळी शिंदी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे.


हे पण वाचा..


हे आवश्यक करा…

अशा स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी वाचा आणि शेअर करा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७ अंतर्गत सिंदखेडराजा येथे आयोजित जनजागृती अभियानातील पदाधिकारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रणशिंग; मिशन-२०२७ जनजागृती अभियानाला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा

अमडापूर पोलिसांचा जंगलात मोठा छापा; अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा

Leave a Comment