साखरखेर्डा ,प्रतिनिधी |समाधान सरकटे
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगतिशील महिला शेतकरी सौ. सुनिता भानुदास आव्हाड यांनी गुलाब शेतीत उल्लेखनीय यश संपादन करत आर्थिक प्रगतीचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कृषी विभागाच्या वतीने त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते सुनिता आव्हाड यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे आंबेवाडी गावासह संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हे पण वाचा..
- शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! MahaDBT वर अर्ज सुरू; विविध योजनांवर ५०% पर्यंत अनुदान
- डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात बेकायदेशीर जैव उत्तेजक खतांचा साठा; ‘कृषी मित्र’ भरतीवर फसवणुकीचा गंभीर आरोप
- कर्तव्यावर निघालेल्या एसटी बसचालकाचा भीषण अपघातात मृत्यू; भरधाव बोलेरोची जोरदार धडक
वाचकांसाठी आवाहन
अशाच शेती, ग्रामीण, कृषी, रोजगार, सरकारी योजना आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in नियमित भेट द्या. ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.










