हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

On: March 18, 2026 7:52 PM
Follow Us:
सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजा| १८ मार्च २०२६

सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशासनाचा मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेकडो आशा सेविकांना अपुऱ्या नियोजनामुळे उपाशी राहावे लागले. धक्कादायक बाब म्हणजे, दीर्घ प्रतीक्षा आणि अन्नाअभावी एका सेविकेला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली व तिचा हात फ्रॅक्चर झाला.

जिजाऊ सृष्टी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश आपत्तीच्या काळात तातडीने मदत करण्यासाठी आशा सेविकांना प्रशिक्षण देणे हा होता. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनाच्या समन्वयाअभावी मोठा गोंधळ निर्माण झाला. भोजन व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याने अनेक महिलांना उपाशीच राहावे लागले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या घटनेमुळे संतप्त झालेल्या आशा सेविकांनी तहसील कार्यालयात धाव घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही काळ त्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

या संदर्भात निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार यांनी सांगितले की, प्रशिक्षणासाठी मर्यादित संख्येतील सेविकांना बोलावण्यात आले होते. मात्र, पत्रातील ‘आपत्तीप्रवण गावांतील’ या शब्दाचा व्यापक अर्थ घेत मोठ्या संख्येने सेविका कार्यक्रमस्थळी आल्याने भोजन व्यवस्था अपुरी पडली.

दरम्यान, या घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास काहाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच जखमी सेविकेला तातडीने वैद्यकीय उपचार व आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे आपत्ती व्यवस्थापनासारख्या गंभीर विषयावर आयोजित कार्यक्रमातही प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.


👉 Related News

👉 हे आवश्यक करा 

अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी शेअर करा आणि आपल्या मित्रांना अपडेट ठेवा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांनी निक्षय मित्र म्हणून टीबी रुग्ण दत्तक घेतल्यावेळी

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा मोठा पुढाकार; सहा महिन्यांसाठी टीबी रुग्ण दत्तक

Leave a Comment