Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे. पडताळणीदरम्यान अनेक महिलांनी चुकीची माहिती भरल्याचं लक्षात आल्यानंतर प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे.तुमचं नाव त्या यादीत आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
तब्बल 1600 महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
तब्बल 1600 महिलांना धक्का नाशिक जिल्ह्यात पडताळणी करताना अनेक महिलांच्या अर्जात दुबार नावे व अपूर्ण कागदपत्रं आढळली. त्यामुळे प्रशासनाने या महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र घोषित केलं आहे.ही कारवाई पुढील काही दिवसांत इतर जिल्ह्यांतही सुरू होण्याची शक्यता आहे.
ई-केवायसी प्रक्रिया थांबवली, पण पडताळणी सुरू
राज्य सरकारने सध्या E-KYC प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. मात्र, अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच आहे.या निर्णयामागे महिलांची नाराजी टाळण्याचा आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण शांत ठेवण्याचा उद्देश असल्याचं प्रशासन सूत्रांचं म्हणणं आहे.
लाडकी बहीण योजनेचे पात्रता निकष
महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी
वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावेएका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच लाभ
चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबांना लाभ मिळणार नाही
ही अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांना आता योजनेतून वगळण्यात येत आहे.
लाभार्थ्यांनी काय करावं ?
जर तुम्ही या योजनेची लाभार्थी असाल, तर तुमचं नाव अधिकृत यादीत तपासा.तुमची माहिती योग्य असेल तर लाभ सुरूच राहील. चुकीची माहिती दिली असल्यास तुमचं नाव हटवलं जाऊ शकतं.
पडताळणीसाठी जवळच्या महिला बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.
















