हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठांसाठी दिलासा! संजय गांधी योजनेची प्रकरणे 21 मार्चपर्यंत निकाली काढण्याचे आदेश

On: March 12, 2026 5:33 PM
Follow Us:
मलकापूर येथे संजय गांधी निराधार योजनेच्या प्रलंबित प्रकरणांबाबत कलीम शेख यांनी SDO संतोष शिंदे यांना निवेदन दिले

मलकापूर (प्रतिनिधी) |१२ मार्च २०२६

दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची असलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने राज्य सचिव कलीम शेख यांनी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदन देत प्रकरणे निकाली काढण्याची मागणी केली.

आगामी आर्थिक वर्ष 2025-26 चा मार्च महिना लक्षात घेता संजय गांधी योजनेतील अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी या सर्व प्रकरणांचा निपटारा होणे अत्यंत आवश्यक असल्याचे संघटनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

निवेदनात पुढे सांगण्यात आले की, 31 मार्च नंतर लाभार्थ्यांना पुन्हा उत्पन्न दाखले सादर करावे लागतात. त्यामुळे दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

दरम्यान, संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार चव्हाण हे खाजगी कारणामुळे रजेवर असल्याचे कार्यालयाकडून समजले. त्यामुळे त्यांचा प्रभार ज्यांच्याकडे देण्यात आला आहे, त्यांना प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती कलीम शेख यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी तातडीने प्रभारी नायब तहसीलदार चौधरी मॅडम यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून 21 मार्चपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले.

या निर्णयामुळे दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. यावेळी दिव्यांग संघटनेचे कलीम शेख, इमरान शेख आणि जाफर खान यांनी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांचे आभार मानले.


Related News


Call To Action
ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. आपल्या परिसरातील बातम्या व अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे पोर्टल फॉलो करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment