हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

६७ लाखांची पाणी योजना फेल! मंगरूळ ग्रामस्थांचा संताप — तहानलेल्या गावाचा आमरण उपोषणाला सुरुवात

On: May 6, 2026 7:42 AM
Follow Us:
मंगरूळ गावातील पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

चिखली |समाधान सरकटे 

दोन वर्षांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळलेल्या मंगरूळ गावातील नागरिकांचा संयम अखेर संपला आहे. शासनाकडून मंजूर झालेल्या तब्बल ६७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेनंतरही गावात थेंबभर पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालय, चिखली समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. “पाणी द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

माहितीनुसार, सन २०२१ मध्ये मंगरूळ गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकणे, विहीर खोदणे आणि वीज कनेक्शन देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या मते, ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या संगनमतामुळे पाईपलाईन चुकीच्या व बुडीत क्षेत्रातून टाकण्यात आली. त्यामुळे वारंवार गळती होत असून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. लाखो रुपये खर्चूनही गावातील नागरिकांना पाण्यासाठी अजूनही वणवण भटकंती करावी लागत आहे.

या गंभीर परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली होती. तसेच ५ मेपासून उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे महिलांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोज पाण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“शासनाचा पैसा अक्षरशः पाण्यात गेला आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि तात्काळ शाश्वत पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा आंदोलक ग्रामस्थांनी दिला आहे.


👉 Related News


📢 हे नक्की करा..

तुमच्या परिसरातील अशाच समस्यांबाबत आम्हाला कळवा. तुमची बातमी थेट Kattanews.in वर प्रसिद्ध केली जाईल.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment