हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

“रोपवाटीकांना आग लागते की लावली जाते?” सिंदखेडराजात दुसऱ्यांदा ५५५५ रोपे जळाली; मोठा घोटाळा?

Follow Us:
सिंदखेडराजा निमगाव वायाळ रोपवाटिका आग ५५५५ रोपे जळाली

सिंदखेडराजा (बुलढाणा) |प्रा.दिलीप नाईकवाड

सिंदखेडराजा तालुक्यातील रोपवाटिकांमध्ये लागोपाठ लागणाऱ्या आगींमुळे मोठा संशय निर्माण झाला आहे. निमगाव वायाळ येथे तब्बल ५ हेक्टरमधील ५५५५ रोपे जळून खाक झाली असून, ही आग नैसर्गिक की जाणूनबुजून लावलेली, असा ज्वलंत प्रश्न आता उपस्थित होत आहे.

याआधी काळापाणी येथील अमृतवन रोपवाटिका जळाल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळेच आता पुन्हा अशीच घटना घडल्याने “हा अपघात नसून कटकारस्थान आहे का?” अशी चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

सामाजिक कार्यकर्ते गजानन कहाळे यांनी या प्रकरणी मुख्य वनसंरक्षक अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी सुरू नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

२०२३ पासून शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून ही रोपवाटिका उभारली होती. तरीदेखील जाळरेषा न करणे, गवत साफ न करणे यासारख्या प्राथमिक उपाययोजना न केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.

“जर वेळेत योग्य कामं झाली असती तर हजारो रोपे वाचली असती” असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच काही जणांनी हा प्रकार भ्रष्टाचार लपवण्यासाठी मुद्दाम घडवला गेला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या आगीत केवळ रोपेच नाही तर लहान सजीव, पक्षी आणि वन्यजीवही होरपळून गेले आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी खर्च होणारा निधी आणि यंत्रणा यावरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

“सरकारी पैशांची अशी राख होत असेल, तर जबाबदार कोण?” हा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे. आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


📢 Related News


👉 हे आवश्यक करा..

अशाच ब्रेकिंग आणि तपासात्मक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा. ही बातमी शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Rohit Pawar vs Sanjay Gaikwad Shivaji Kon Hota book controversy Maharashtra political news

‘7 तारखेला येतो… समोर ये!’ रोहित पवार vs संजय गायकवाड; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून महाराष्ट्रात मोठा वाद

बुलढाण्यातील आंदोलन, प्रशांत आंबी डिटेन, संजय गायकवाड वाद, शिवाजी महाराज मुद्दा

Breaking: प्रशांत आंबी चिखलीत डिटेन; बुलढाण्यात गायकवाडांविरोधात मोठं आंदोलन पेटलं

बुलढाणा येथे गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन आणि पोलिस बंदोबस्त

बुलढाणा तणावग्रस्त! आमदार संजय गायकवाडांच्या घराबाहेर आंदोलन उफाळलं; पोलिसांशी झटापट, अनेक जण ताब्यात

लोणारमध्ये संजुभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ शिवप्रेमींचा दुग्धाभिषेक सोहळा

लोणारमध्ये शिवप्रेमींचा जल्लोष! संजुभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ भव्य दुग्धाभिषेक; ‘छत्रपतींचा अपमान सहन नाही’ इशारा

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित योजना 2026 महाराष्ट्र

मोठा दिलासा! १ जानेवारी २०११ पूर्वीची घरांची अतिक्रमणे होणार कायदेशीर — अर्जाची शेवटची तारीख जाहीर

बुलढाणा शेतकरी आंदोलन पिक विमा नुकसान भरपाई

100% नुकसान, तरीही पिक विमा नाही! बुलढाण्यात शेतकऱ्यांचा एल्गार; 29 एप्रिलपासून आमरण उपोषण

Leave a Comment