मोताळा/प्रवीण गरुडे
आव्हा शिवारात आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शेतात करंट लागून महिला मजूराचा मृत्यू झाल्याची ही हृदयद्रावक घटना असून, मोलमजुरीवर जगणाऱ्या दिव्यांग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतात कामासाठी जात असताना शेतात करंट लागून महिला मजूराचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच शेतात करंट लागून महिला मजूराचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कमलबाई भारती यांच्यासोबत असलेल्या इतर महिला घाबरून दूर पळाल्याने बचावल्या. मृत कमलबाई तसेच त्यांचे पती डिगंबर भारती हे दोघेही दिव्यांग असून भूमिहीन आहेत. मोलमजुरीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबाला कोणताही आधार नसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेनंतर काही काळ शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेश जायले, कोल्हीचे सरपंच शिवाजीराव बोराडे, माजी सभापती अवि पाटील, आव्हा सरपंच स्वप्नील घोंगटे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मलकापूर येथे पाठवण्यात आला असून धामणगाव बढे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दिव्यांग कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
👉 अशाच ग्रामीण भागातील सत्य, संवेदनशील आणि ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला Follow करा.











