मेहकर | समाधान सरकटे
📲 KattaNews WhatsApp Group
महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव साकर्शा येथे गोवंशाची अवैध कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती जानेफळ पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पडताळणी करून ठाणेदार शरद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
त्यानंतर शुक्रवारी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून अंदाजे १ क्विंटल २६ किलो संशयित गोमांस, कत्तलीसाठी वापरले जाणारे चाकू, सुरे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४३ हजार १५० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शेख अफसर शेख वाहब आणि शेख रिजवान शेख गफ्फार (दोघेही रा. देऊळगाव साकर्शा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण (गोवंश हत्या प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन्ही आरोपींना मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या तपासाद्वारे या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, याचाही शोध घेतला जात आहे.
या कारवाईनंतर ठाणेदार शरद माळी यांनी अवैध गोवंश हत्या आणि संबंधित बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक शरद माळी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरी काकड, अतुल पवार, भागवत पाटोळे, अमोल अंभोरे, विशाल धोंडगे, विष्णू निकम तसेच महिला पोलीस कर्मचारी शिवकन्या आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
👉 तुमच्याकडेही एखादी महत्त्वाची बातमी आहे?
तुमच्या परिसरातील घडामोडी, सामाजिक उपक्रम, अपघात, प्रशासनाशी संबंधित बातम्या किंवा अन्य महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. पडताळणीनंतर ती KattaNews.in वर प्रसिद्ध केली जाईल. व्हाट्सअप -9561475736
KattaNews.in — महाराष्ट्राच्या विश्वासार्ह बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ.
संबंधित बातम्या
- ➡️ शेगावात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून 3 बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता
- ➡️ खामगावात बँक व्यवस्थापक व कृषी अधिकाऱ्याला मारहाण; स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार यांच्यावर गुन्हा
- ➡️ शेत आणि पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा होणार मोठी वृक्षलागवड; महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
- ➡️ बुलढाणा जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज अपडेट











