KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

शेगावात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून 3 बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता

On: July 29, 2026 8:09 PM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दोन आस्थापनांवर कारवाई करत तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता करण्यात आली.

शेगाव |विशाल गवई 

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे बालकामगारांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई करत दोन आस्थापनांमधून तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता केली आहे. या प्रकरणी संबंधित आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून बालकामगारांना रोजगार देणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

📲 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा!
महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्या मिळवण्यासाठी KattaNews WhatsApp Group आजच जॉईन करा.

बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 (सुधारणा 2016) अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत कृतीदलाने 28 जुलै रोजी शेगाव शहरात विशेष धाडसत्र राबविले. या कारवाईदरम्यान खामगाव रोडवरील इंडियन मोटर गॅरेजमध्ये एक बालकामगार काम करत असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्प्रिंग पार्ट अँड वेल्डिंग वर्क्स या आस्थापनामध्ये दोन किशोरवयीन कामगार कार्यरत असल्याचे आढळून आले.

कृतीदलाने तातडीने तिन्ही बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता केली. त्यानंतर संबंधित आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. प्रशासनाने अशा प्रकारच्या प्रकरणांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कामगार विभागाच्या माहितीनुसार, बालकामगार किंवा किशोरवयीन कामगारांना बेकायदेशीररीत्या कामावर ठेवणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. बालकामगार आढळल्यास कोणताही नागरिक, पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकारी संबंधित विभागाला माहिती देऊ शकतो. अधिनियमाच्या कलम 14 अंतर्गत दोषी आस्थापनाधारकांवर दंडात्मक कारवाईची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.

बालकामगारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत बालकामगारांना रोजगार देऊ नये आणि अशी माहिती त्वरित प्रशासनापर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले.

ही कारवाई कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत (अमरावती) आणि सहाय्यक कामगार आयुक्त राहुल काळे (अकोला) यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार अधिकारी शैलेश देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत दुकाने निरीक्षक, महिला व बालविकास विभाग, कामगार विभागाचे कर्मचारी तसेच शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.


Related News


टीप : महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन

सक्तीची कर्जवसुली थांबवा, स्मार्ट मीटर हटवा! मोताळ्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनाला अल्टिमेटम

देऊळगाव राजा पोलीस आणि तेलंगणा LCB प्रकरण

मामाच्या तक्रारीवरून अपहरणाची नोंद करण्याची देऊळगाव राजा पोलिसांना घाई का? तेलंगणा LCB प्रकरणात सवाल

जुने मंडपगाव शिवारात अवैध रेती वाहतुकीप्रकरणी जप्त केलेले नऊ टिप्पर

देऊळगाव राजा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल-पोलिसांची धडक कारवाई; एकाच वेळी ९ टिप्पर जप्त

इंस्टाग्रामवर प्रेम जुळल्याने साखरखेर्डा येथील संसार मोडल्याची घटना

इंस्टाग्रामवर प्रेम जुळले, १२ वर्षांचा संसार मोडला! चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन महिला ३० वर्षीय युवकासोबत निघून गेली

नेवासा सोयाबीन चोरी प्रकरणात देऊळगाव राजा येथील तिघांना अटक

नेवासा सोयाबीन चोरीचा तपास थेट देऊळगाव राजात; पाच जणांची नावे समोर, तिघांना अटक, दोघे फरार

देऊळगाव राजा येथे तेलंगणा पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला ताब्यात घेतल्याची घटना

देऊळगाव राजात तहसील कार्यालयातून सराफाला नेले; अपहरणाची चर्चा, नाकाबंदीत तेलंगणा पोलिसांचा मोठा खुलासा!

Leave a comment