हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना फसली? दोन वर्षांपासून शेतकरी लाभापासून वंचित — महावितरणवर गंभीर आरोप

On: January 4, 2026 7:31 AM
Follow Us:
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत दोन वर्षांपासून लाभ न मिळाल्याने शेतकरी मदन वीर यांचे नुकसान

समाधान सरकटे/सिंदखेडराजा

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा आणि शेतीसाठी पाण्याची अडचण दूर व्हावी, यासाठी शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली. मात्र प्रत्यक्षात मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अनेक शेतकऱ्यांसाठी फक्त कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज करूनही दोन वर्षांपासून लाभ न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना प्रभावीपणे राबवण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील शेतकरी मदन सोनाजी वीर यांनी वर्ष 2024 मध्ये या योजनेसाठी रितसर अर्ज दाखल केला होता. त्यांनी नियमानुसार भरणा केला असून त्याची पावती तसेच आवश्यक कागदपत्रे महावितरणकडे सादर केली आहेत. तरीही आजपर्यंत त्यांच्या अर्जावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.सौर कृषी पंप न मिळाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे. पाण्याअभावी पिके वेळेवर घेता आली नाहीत. याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला असून मानसिक तणावातही वाढ झाली आहे.

 

हे पण वाचा..

“बाई मेली तरी मला फरक पडत नाही!” — सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचारावर महिलाचे आमरण उपोषण; झेडपी CEO चा कथित संतापजनक उद्गार. 

“शासनाने चांगली योजना आणली, पण अंमलबजावणीच होत नसेल तर शेतकऱ्यांनी अपेक्षा कुणाकडून करायच्या?” असा सवाल मदन वीर यांनी उपस्थित केला आहे. महावितरणने तातडीने अर्जाचा विचार करून पारेषण विरहित कृषी सौर पंप बसवून विजपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.


📌 शेतकऱ्यांची प्रमुख मागणी

  • प्रलंबित अर्जांची तातडीने चौकशी
  • पारेषण विरहित सौर कृषी पंप त्वरित बसवणे
  • उशिरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई

👉 हे आवश्य करा..

तुमचाही सौर कृषी पंप अर्ज प्रलंबित आहे का?
अशा समस्या तुमच्या परिसरात असतील तर Kattanews.in शी संपर्क साधा. तुमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवू.


🔗 हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

भूमिहीन अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबांसाठी मोफत शेतजमीन योजना

भूमिहीनांना मोफत शेतजमीन! अनुसूचित जाती, नवबौद्ध कुटुंबांसाठी मोठी संधी; ५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव द्या

बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचे पैसे थेट खात्यात जमा होणार; 10.78 कोटींचा निधी मंजूर

लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्ट हप्ता 2026 अपडेट

लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठी अपडेट! जुलै-ऑगस्टचा ₹3,000 हप्ता कधी मिळणार? e-KYC बाबतही महत्त्वाची माहिती

Namo Shetkari Yojana 2000 Installment Update Katta News

Namo Shetkari Yojana : ₹२००० चा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार; राज्य शासनाचा मोठा निर्णय, पहा संपूर्ण माहिती!

₹10 आणि ₹20 च्या पॉलिमर प्लास्टिक नोटांच्या फील्ड ट्रायलची माहिती

₹10 आणि ₹20 च्या नोटांबाबत मोठी बातमी! आता प्लास्टिकच्या नोटा येणार? केंद्राची मंजुरी

बुलढाणा जिल्ह्यातील 34,855 शेतकऱ्यांच्या खात्यात 295.47 कोटी रुपये जमा

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 34,855 खात्यांत 295.47 कोटी रुपये जमा

Leave a Comment