मुंबई | नारायणराव आरु पाटील
महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी माहिती दिली. कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून प्राथमिक लाभार्थी यादी आज जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार सहकार विभागाने आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी पूर्ण केली असून लाभार्थ्यांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यासाठी अंतिम प्रक्रिया सुरू आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीच्या यादीची प्रतीक्षा करत आहेत. सरकारकडून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबतही माहिती दिली. तसेच दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र हिंसा आणि अराजकता कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफीची प्राथमिक यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या नावाची पडताळणी करता येणार आहे. पुढील प्रक्रियेबाबत सरकारकडून अधिकृत सूचना जारी करण्यात येणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या
- ✔️ लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! आषाढी एकादशीला 26 वस्तूंचे किट; एकनाथ शिंदे यांनी सांगितली संपूर्ण माहिती
- ✔️ शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! MahaDBT वर अर्ज सुरू; विविध योजनांवर ५०% पर्यंत अनुदान
- ✔️ 55.72 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, सरकार खर्च करणार 36,585 कोटी रुपये










