हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

गरीबांच्या ताटातील घास लुटण्याचा प्रयत्न? बुलढाण्यात 41 क्विंटल सरकारी रेशनचा तांदूळ जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

On: July 21, 2026 10:28 AM
Follow Us:
बुलढाण्यात धाड पोलिसांनी 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आणि आयशर वाहन जप्त करत मोठी कारवाई केली.
बुलढाणा : भागवत गायकवाड

गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (रेशन) वितरित करण्यात येणारा तांदूळ अवैधरित्या वाहतूक केला जात असल्याचा संशय व्यक्त होत असताना बुलढाणा जिल्ह्यात धाड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून तब्बल 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आणि तो वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेले आयशर वाहन जप्त केले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक 5, नसीब नगर परिसरात सरकारी रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रविंद्र चव्हाण, हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्णा चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल भगवान खमाटे यांनी शासकीय वाहनातून घटनास्थळी जाऊन संशयित वाहनाची तपासणी केली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

तपासणीदरम्यान आयशर कंपनीचे विक्टरी रंगाचे MH-04-BG-6022 क्रमांकाचे वाहन अडविण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 84 पोत्यांमध्ये 4,163 किलो म्हणजेच 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आढळून आला. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून संपूर्ण तांदूळ आणि वाहन ताब्यात घेतले.

जप्त करण्यात आलेल्या तांदळाची अंदाजे किंमत 41 हजार 600 रुपये असून वाहनाची अंदाजे किंमत 3 लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण 3 लाख 41 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याच्या अवैध वाहतुकीविरोधातील महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

प्राथमिक चौकशीत हे वाहन सलीम खान युसुफ खान (वय 42, रा. वॉर्ड क्र. 5, नसीब नगर, धाड) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेला तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून संपूर्ण मुद्देमाल पुढील तपासासाठी धाड पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला.

या प्रकरणात आवश्यक कायदेशीर कार्यवाहीसाठी बुलढाणा तहसीलदार कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. तहसीलदारांच्या अहवालानंतर अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 मधील कलम 3 आणि 7 अन्वये धाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच सरकारी रेशनचा तांदूळ नेमका कुठे नेला जात होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

📢 KattaNews.in WhatsApp Channel
महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, शेती, हवामान आणि नोकरीच्या ताज्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp चॅनेलला आजच जॉईन करा.

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाण्यात २९ जुलै २०२६ रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आयोजित जिल्हास्तरीय महामोर्चा

२९ जुलैला बुलढाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात जिल्हास्तरीय महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार

खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट बाहेर काढताना मजुराचा मृत्यू; अवैध वाळू उपशाचा संशय

जास्तीच्या मजुरीच्या आमिषाने गेला जीव! खडकपूर्णा प्रकल्पात बुडालेली बोट काढताना मजुराचा दुर्दैवी मृत्यू; तिघे पोलिसांच्या ताब्यात

चिखली पोलिसांची मोठी कारवाई, MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध आणि दोघांना तडीपार

चिखली पोलिसांची मोठी कारवाई! MPDA अंतर्गत सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, दोघांना 3 महिन्यांसाठी तडीपार

बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी मध्य प्रदेशातील कंपनीवर बुलढाण्यात गुन्हा दाखल

बोगस सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई! मध्य प्रदेशातील कंपनीवर गुन्हा; हजारो शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मागणी

बुलढाणा शहरातील 132 KV विद्युत टॉवर परिसरातील घटनेनंतर तपास करत असलेले पोलीस

बुलढाणा हादरलं! 132 KV विद्युत टॉवर परिसरात 29 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

भास्करराव शिंगणे विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप करताना मान्यवर

भास्करराव शिंगणे विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप; शिक्षणाला मिळाले नवे बळ

Leave a Comment