हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा हादरलं! 132 KV विद्युत टॉवर परिसरात 29 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

On: July 19, 2026 11:14 AM
Follow Us:
बुलढाणा शहरातील 132 KV विद्युत टॉवर परिसरातील घटनेनंतर तपास करत असलेले पोलीस

बुलढाणा | विशाल गवई

बुलढाणा शहरात शनिवारी (18 जुलै) सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शामनगर परिसरातील 29 वर्षीय धिरज बबनराव सनगाळे यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धिरज सनगाळे हे शनिवारी पहाटे घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास 132 केव्ही विद्युत लाईनच्या टॉवर परिसरात ते गंभीर अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय मल्लीकार्जून वाघमोडे करत आहेत.

धिरज सनगाळे हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बबनराव सनगाळे यांचे पुत्र असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. या घटनेमुळे शामनगर परिसरासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.


📲 KattaNews.in WhatsApp Channel
महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्या मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.👉 येथे क्लिक करून WhatsApp Group Join करा

Related News

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment