हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अंगणातील क्षुल्लक वाद जीवावर बेतला; चिखलीत दाम्पत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

On: July 17, 2026 6:42 PM
Follow Us:
chikhli-couple-knife-attack-buldhana-kattanews.webp

मेरा बु.,प्रतिनिधी | सुनिल अंभोरे 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील आसोला बु. येथे अंगणातील दगड उचलण्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद हिंसक वळणावर गेला. या वादातून एका दाम्पत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना १३ जुलै रोजी घडली. या हल्ल्यात पती आणि पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अंढेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जावेद शेख कादर (वय ५४, व्यवसाय – शेती, रा. आसोला बु.) हे आपल्या घराजवळ असताना अंगणातील दगड उचलण्याच्या कारणावरून शेजारी शेख दस्तगीर शेख आलमगीर आणि समीना बी दस्तगीर शेख यांच्याशी वाद झाला. हा वाद काही क्षणांतच उग्र बनला.

आरोपींनी संगनमताने फिर्यादी तसेच त्यांच्या पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दोघांच्या डोक्यावर, गळ्यावर आणि उजव्या हातावर गंभीर जखमा झाल्या. परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

जखमींचा वैद्यकीय अहवाल आणि फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे अंढेरा पोलीस ठाण्यात आरोपी शेख दस्तगीर शेख आलमगीर आणि समीना बी दस्तगीर शेख (रा. आसोला बु., ता. चिखली) यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक २३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा विभाग, पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे आणि पीएसआय दिनेश घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय दिनेश घुगे करीत आहेत.

या घटनेमुळे आसोला बु. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ कारणावरून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.


📲 KattaNews.in WhatsApp Channelबुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वात वेगवान, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

संबंधित बातम्या


वाचकांसाठी सूचना

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, अपघात, गुन्हे किंवा सामाजिक बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवा. सत्य आणि विश्वासार्ह बातम्यांना KattaNews.in नेहमीच प्राधान्य देते.

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बकरीच्या पैशांवरून वादानंतर वडिलांचा मृत्यू

म्हातारपणी ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाने बकरीच्या पैशांवरून घेतला वडिलांचा जीव

अंढेरा पोलिसांनी पकडलेले अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर

अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई! रेतीची अवैध वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले; ८ ब्रास रेतीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

चिखली-खामगाव मार्गावर बस आणि टिप्परची जोरदार धडक

चिखली-खामगाव मार्गावर भीषण अपघात! बस-टिप्परची जोरदार धडक; टिप्परचा चुराडा

चिखलीतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे निवेदन देताना उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर

चिखलीत मुलींच्या छेडछाडीविरोधात उपनगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा; “कारवाई करा, अन्यथा महिलांना घेऊन रस्त्यावर उतरू!”

MPSC पेपरफुटी प्रकरणात अवर सचिवासह 6 जणांना अटक

MPSC पेपरफुटीचा धक्कादायक भांडाफोड; अवर सचिवासह 6 जणांना अटक, प्रेमभंगातून फुटला पेपर

अंजनी खुर्द येथे ईद मिलाद निमित्त मदरशातील मुलांचा जुलूस

अंजनी खुर्दमध्ये ईद मिलादचा उत्साह; मदरशातील मुलांचा जुलूस अन् नात-कलिमाचे पठण

Leave a Comment