वाशिम | नारायणराव आरु पाटील
शांत आणि नेहमीप्रमाणे सुरू असलेला व्यवसाय… अचानक रात्रीच्या अंधारात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पूर्णपणे उध्वस्त झाला! बेलखेड फाट्यावर मटन आणि मच्छी विक्री करणाऱ्या लघु व्यवसायिकांच्या खोक्यांवर अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. पहाटे हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून पीडित व्यवसायिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या रोजीरोटीवरच घाला घातल्याने या घटनेने अनेक कुटुंबांवर संकट ओढवले आहे.
या घटनेची माहिती पीडित व्यवसायिकांनी 5 मे रोजी सकाळी सुमारे 7 वाजता दिली. त्यानंतर त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र, वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद होणे बाकी असल्याचे समजते.
या प्रकारामुळे लघु व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “आमच्यावर झालेल्या अन्यायाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी” अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
👉 Related News
- Breaking: महाराष्ट्रासाठी Weather Alert, विजांसह पावसाचा इशारा – किती वेळ सतर्क राहावे ?
- वाशिम जिल्ह्यात सरपंच निवडणूक निकाल जाहीर – पिंपरखेड-वाडी व वडजीत कोण जिंकले? पाहा संपूर्ण आकडेवारी
- साखरखेर्डा पोलिसांची अंमली पदार्थांवर मोठी कारवाई
📢 तुमच्या परिसरातील बातम्या आम्हाला पाठवा: kattanews.in@gmail.com
👉 Kattanews.in ला Follow करा आणि ताज्या अपडेटसाठी जोडलेले राहा.














