हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

On: August 7, 2026 9:48 AM
Follow Us:
मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

मेहकर | समाधान सरकटे 

न्यायव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास असताना त्याच व्यवस्थेतील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक झाल्याने मेहकरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जंगम मालमत्ता जप्तीचे न्यायालयीन वॉरंट बजावू नये, यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मेहकर येथील दिवाणी न्यायालयातील बेलिफ जगदीश सुखदेव राऊत (वय 31) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी बसस्थानक परिसरात रंगेहात पकडले.

📲 KattaNews WhatsApp Group

महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा.

👉 WhatsApp Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय 53, व्यवसाय – शेती) यांच्या विरोधात मेहकर येथील दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित आहे. या प्रकरणात न्यायालयाने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट काढले होते. हे वॉरंट बजावू नये आणि न बजावताच परत करावे, यासाठी बेलिफ जगदीश राऊत यांनी सुरुवातीला 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली होती.

तक्रारीनंतर 6 ऑगस्ट रोजी दुपारी न्यायालय परिसरात पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने 15 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर झालेल्या चर्चेत 10 हजार रुपयांवर तडजोड झाली. त्यानुसार ACBच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला.

गुरुवारी दुपारी 2.07 ते 2.12 या वेळेत मेहकर बसस्थानक परिसरात तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACBच्या अधिकाऱ्यांनी बेलिफ जगदीश राऊत याला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली.

आरोपी जगदीश सुखदेव राऊत हा मेहकर येथील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) येथे बेलिफ म्हणून कार्यरत असून त्याचे मूळ गाव साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) येथील माळीपुरा आहे. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई बुलढाणा ACBचे पोलीस निरीक्षक रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांनी पर्यवेक्षण केले. पथकात पोलीस कॉन्स्टेबल शैलेश सोनवणे, पंढरी शेळके आणि नितीन शेटे यांचा सहभाग होता. या कारवाईस अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.

विशेष म्हणजे, यापूर्वी 28 फेब्रुवारी 2025 रोजी मेहकर न्यायालयातील सरकारी अधिवक्त्यालाही लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. दीड वर्षाच्या कालावधीत न्यायालयाशी संबंधित दुसऱ्या अधिकाऱ्यावरही लाचखोरीची कारवाई झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

📢 तुमच्याकडेही अशी माहिती आहे का?

तुमच्या परिसरातील ताज्या घडामोडी, अपघात, गुन्हे, सरकारी योजना किंवा इतर महत्त्वाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमची माहिती गोपनीय ठेवली जाईल.

KattaNews.in – जनतेचा विश्वास, सत्याचा आवाज.

📰 संबंधित बातम्या

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

बुलढाणा वन सर्वेक्षक लाच प्रकरणात एसीबीची कारवाई

लाकूड वाहतुकीच्या परवानगीसाठी २ हजारांची लाच; बुलढाण्यात वन सर्वेक्षकावर गुन्हा दाखल

बेपत्ता महिला शेगाव - पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

शेगाव: ब्युटी पार्लरमध्ये जाते सांगून घराबाहेर पडलेली महिला बेपत्ता, पतीची पोलिसांत तक्रार

Leave a Comment