हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक! रात्रीच्या अंधारात कारने उध्वस्त केले लघु व्यवसायिकांचे दुकान

Follow Us:
बेलखेड फाटा वाशिम येथे कारने दुकानाचे नुकसान झाल्याचे दृश्य

वाशिम | नारायणराव आरु पाटील 

शांत आणि नेहमीप्रमाणे सुरू असलेला व्यवसाय… अचानक रात्रीच्या अंधारात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पूर्णपणे उध्वस्त झाला! बेलखेड फाट्यावर मटन आणि मच्छी विक्री करणाऱ्या लघु व्यवसायिकांच्या खोक्यांवर अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. पहाटे हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून पीडित व्यवसायिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या रोजीरोटीवरच घाला घातल्याने या घटनेने अनेक कुटुंबांवर संकट ओढवले आहे.

वाशिम ते रिसोड राज्यमार्ग क्रमांक 51 वरील बेलखेड फाटा परिसरात रस्त्यालगत अनेक लघु व्यवसायिक आपला उदरनिर्वाह करतात. दिनांक 4 मे रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चारचाकी वाहनाच्या सहाय्याने या खोक्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये सर्वाधिक नुकसान येवती येथील शेख हबीब शेख अफसर यांच्या दुकानाचे झाले असून सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच पार्डी तिखे येथील दुसऱ्या व्यवसायिकाचे जवळपास 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असून देऊळगाव बंडा येथील गणेश गोडघासे यांच्या खोक्यालाही काही प्रमाणात हानी पोहोचली आहे. घटनेदरम्यान दुकानातील साहित्य, तराजू यांचीही मोठ्या प्रमाणात फेकाफेक करण्यात आली असल्याचे दिसून आले.प्रत्यक्ष पाहणीदरम्यान ही तोडफोड जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चारचाकी वाहनाच्या धडकेमुळेच हे नुकसान झाले असल्याचे स्पष्टपणे लक्षात येत आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या घटनेची माहिती पीडित व्यवसायिकांनी 5 मे रोजी सकाळी सुमारे 7 वाजता दिली. त्यानंतर त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र, वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद होणे बाकी असल्याचे समजते.

या प्रकारामुळे लघु व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “आमच्यावर झालेल्या अन्यायाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी” अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.


👉 Related News


📢 तुमच्या परिसरातील बातम्या आम्हाला पाठवा: kattanews.in@gmail.com

👉 Kattanews.in ला Follow करा आणि ताज्या अपडेटसाठी जोडलेले राहा.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे पोलिसांची कारवाई

मेहकर तालुक्यात मोठी कारवाई; देऊळगाव साकर्शा येथे १ क्विंटल २६ किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दोन आस्थापनांवर कारवाई करत तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता करण्यात आली.

शेगावात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून 3 बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता

Leave a Comment