हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

On: August 7, 2026 2:59 PM
Follow Us:
मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर : विनायक कुटे 

शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी घटना समोर आली आहे. मेहकर शहरात एका रात्रीत दोन ठिकाणी धाडसी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. जुन्या तहसील चौकातील श्रीकृष्ण ज्वेलर्सचे दुकान आणि विठ्ठल नगर येथील न्यू गजानन मेडिकल स्टोअर चोरट्यांनी फोडले. सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच मोठा धक्का बसला.

📢 महाराष्ट्रातील ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

प्राप्त माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. मेहकर येथील जुन्या तहसील चौक परिसरातील श्रीकृष्ण ज्वेलर्स या सराफी दुकानाचे चॅनल गेटचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानाचे शटरचे दोन्ही बाजूचे लॉक तोडले आणि सेंटर लॉक वर उचलून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर काउंटरमध्ये ठेवलेल्या सुमारे ३५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या तोरड्या तसेच व्हिजन कंपनीचा डीव्हीआर असा एकूण सुमारे ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याच रात्री विठ्ठल नगर परिसरातील न्यू गजानन मेडिकल स्टोअरलाही चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानाचे शटर फोडून ड्रॉवरमध्ये ठेवलेली अंदाजे ४ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली.

या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. “आज माझे दुकान… उद्या कोणाचे?” अशी चिंता आता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. गजबजलेल्या तहसील चौक परिसरात आणि पोलिस स्टेशनपासून काही अंतरावरच चोरी झाल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. फिर्यादी चंद्रशेखर वसंतराव काटकर (वय ४७, रा. रामनगर) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले आहेत. पुढील तपास बीट सफौ राजेंद्र काळे करीत आहेत. चोरी गेलेला मुद्देमाल आणि झालेल्या नुकसानीची रक्कम अधिक असल्याची माहिती दुकान मालकांनी दिली असून पोलिस तपासानंतर याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे.


📌 संबंधित बातम्या

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे पोलिसांची कारवाई

मेहकर तालुक्यात मोठी कारवाई; देऊळगाव साकर्शा येथे १ क्विंटल २६ किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

Leave a Comment