हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोड-साखरा रस्त्याच्या खड्ड्यांविरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांचा इशारा

Follow Us:
Risod Sakhara road potholes protest villagers on water tank Washim Maharashtra

रिसोड |२५ फेब्रुवारी २०२६

रिसोड-साखरा मार्गावरील साखरा फाटा ते चिचांबाभर दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. आगरवाडी व परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून “शोले स्टाईल” आंदोलन करत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. अनेक दिवस तक्रारी करूनही दुरुस्ती न झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

मात्र, दिलेल्या आश्वासनानुसार रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

या आंदोलनात गंगोत्री वृद्धाश्रमच्या संचालिका अर्चना गाजरे, सचिन इप्पर, आगरवाडीचे सरपंच, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.


📌 संबंधित बातम्या


👉 तुमच्या परिसरातील समस्या आम्हाला कळवा

स्थानिक बातम्या, समस्या किंवा तक्रारी आम्हाला WhatsApp वर पाठवा.

Kattanews.in – तुमचा विश्वासू स्थानिक आवाज

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

बुलढाण्यात २९ जुलै २०२६ रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात आयोजित जिल्हास्तरीय महामोर्चा

२९ जुलैला बुलढाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात जिल्हास्तरीय महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार

स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७ अंतर्गत सिंदखेडराजा येथे आयोजित जनजागृती अभियानातील पदाधिकारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुन्हा रणशिंग; मिशन-२०२७ जनजागृती अभियानाला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

चिखली नगर परिषदेच्या मालमत्ता करात 10 पट वाढ झाल्याचा आरोप; मनसेने पुरावे सादर करत आंदोलनाचा इशारा

चिखली नगर परिषदेचा अजब कारभार; मालमत्ता करात चक्क 10 पट वाढ? मनसेने सादर केले पुरावे, आंदोलनाचा इशारा

चिखलीतील शेलगाव जहागीर मारहाण प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते

चिखलीत संतापाचा उद्रेक! 24 तासांत आरोपींना अटक नाही तर भव्य निषेध मोर्चा

देऊळगाव मही येथे ५ कोटी रुपयांची जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना रखडल्याच्या निषेधार्थ पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणारे ग्रामस्थ

५ कोटींची ‘जलजीवन’ योजना ५ वर्षांपासून रखडली; पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांचे आंदोलन, प्रशासनाला अखेर झुकावे लागले

Leave a Comment