देऊळगाव राजा | मनोहर खंदारे
बुलढाणा येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील कविता लेखन स्पर्धेत देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मानिनी नायडू हिने द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात युवकांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धांमध्ये श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या वतीने बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या कु. मानिनी नायडू हिने कविता लेखन स्पर्धेत सहभाग घेतला. आपल्या लेखनकौशल्याच्या जोरावर तिने द्वितीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात पोलिस अधिकारी संग्राम पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयाच्या वतीने बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी अक्षय कव्हळे याने चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला. युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्य, कला आणि सर्जनशीलतेतील आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली.
मानिनी नायडू हिच्या या यशाबद्दल श्री बालाजी संस्थान, देऊळगाव राजाचे वंशपारंपरिक विश्वस्त तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी अभिनंदन केले. तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही तिच्या यशाचे कौतुक केले.
या यशासाठी मार्गदर्शन करणारे मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांचेही महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. मानिनीच्या या यशामुळे देऊळगाव राजा परिसरातील शैक्षणिक वर्तुळातून तिचे कौतुक होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!
✅ Katta News WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
हेही वाचा
- 2 GB डेटा संपला, तरी वेबसाइट सुरू होईना! मुख्यमंत्री पशुसंवर्धन ग्रामीण योजनेचा बोजवारा; ऑनलाइन अर्जातील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त
- ‘आम्ही भिकारी नाही, देशाचे अन्नदाते आहोत!’ ५ हजारांच्या मदतीवर रविकांत तुपकरांचा संताप; १ लाखांची मागणी
- सिंदखेडराजा तालुक्यात रब्बीचा पेरा ८० टक्क्यांनी घटला! केवळ ७,७९० हेक्टरवर पेरणी; दुष्काळामुळे शेतकरी हतबल










