दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ऑपरेशन मुस्कान : रिसोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ अपहरण प्रकरणांचा छडा, हरवलेले चेहरे पुन्हा हसले

On: February 24, 2026 10:53 AM
Follow Us:
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत रिसोड पोलिसांनी हरवलेल्या मुलांची सुटका

रिसोड | वाशिम जिल्हा|२४ फेब्रुवारी २०२६

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत रिसोड पोलिसांनी केलेल्या विशेष शोध मोहिमेत अपहरण प्रकरणांचा छडा लावत बेपत्ता नागरिकांना सुरक्षित परत आणण्यात मोठे यश मिळाले आहे. मागील १५ दिवसांत ४ अपहरण गुन्हे उघडकीस आणत ६ बेपत्ता पुरुष व महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रभावी कारवाईमुळे वाशिम जिल्ह्यात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक मजबूत झाली आहे.

ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदिप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हा पोलीस दलामार्फत ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत अपहरण व हरविलेल्या बालकांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले होते.दि. ११ जानेवारी २०२६ रोजी निजामपूर येथील कमल आत्माराम धुमाळ यांनी १७ वर्षीय मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. पोलिसांनी शोध घेऊन सदर मुलगी मुरगोडा (जि. बेळगाव, कर्नाटक) येथून ताब्यात घेत सुरक्षितपणे कुटुंबाच्या स्वाधीन केली.

दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी लोणी खुर्द येथील भागुबाई पारवे यांनी १७ वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. तपासादरम्यान ती हरदा (जि. खंडवा, मध्यप्रदेश) येथे आढळून आली.

दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवाजीनगर येथील जानुसिंग राठोड यांनी १६ वर्षीय मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली. तपासादरम्यान सदर मुलगा सुलतानपूर (जि. बुलढाणा) येथे सापडला.

दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी वडजी येथील नसरीनबी पठाण यांनी १६ वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी शोध घेऊन मुलगी नागरतास, मालेगाव (जि. वाशिम) येथून ताब्यात घेतली.

रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन मुस्कान’ पथकातील शिवचरण डोंगरे, संजय नंदकुले, वसंत तहकीक, आशिष पाठक, महादेव चव्हाण, मंगेश मालवे, संतोष अवगळे, सुरेश येरमुले, अनिल राठोड, रुपेश मस्के, गणेश हाके, विनोद मस्के, कसुम पठाण, अमोल हाके, माणिक जुगाडे आणि सुनिल तिवाले यांनी ही कामगिरी पार पाडली.

कमी कालावधीत गुन्ह्यांचा छडा लावत प्रभावी तपास केल्याबद्दल पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून या कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.


👉 हे पण वाचा

विजय जुंजारे

विजय जुंजारे हे रिसोड प्रतिनिधी असून वाशिम जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींचे कव्हरेज करतात.त्यांना २ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवतात. त्यांच्या बातम्या वाचकांना विश्वासार्ह आणि नेमकी माहिती देतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखलीतील तलाठी पियुष गायकवाड यांच्या आत्महत्येची बातमी

अवघ्या २६ व्या वर्षी जीवनप्रवास थांबला; चिखलीतील तरुण तलाठी पियुष गायकवाड यांची आत्महत्या

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

शिंदी सरकारी एफ-क्लास जमीन प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिंदी सरकारी जमीन प्रकरणात मोठी घडामोड! तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

देऊळगाव राजा बालाजी महाराज मंदिरात मंगळसूत्र चोरीची घटना

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले

साखरखेर्ड्यात भरदिवसा महिलेच्या घरात घुसून गळा दाबण्याचा प्रयत्न; आरडाओरड ऐकून नागरिकांनी आरोपीला पकडले

चिखली पोलिसांनी गुजरातमधील वाकानेर येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील ४० वर्षीय आरोपीला अटक केली

चिखली पोलिसांची गुजरातमध्ये कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील ४० वर्षीय आरोपीला वाकानेरमधून अटक

Leave a comment