KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

‘आम्ही भिकारी नाही, देशाचे अन्नदाते आहोत!’ ५ हजारांच्या मदतीवर रविकांत तुपकरांचा संताप; १ लाखांची मागणी

On: November 29, 2026 4:50 AM
Follow Us:
शेंदुर्जन येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रविकांत तुपकर

साखरखेर्डा | समाधान सरकटे 

KattaNews जाहिरात

दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होणार नाही. आम्ही भिकारी नसून या देशाचे अन्नदाते आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न देता किमान एक लाख रुपये आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी ठाम मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी एकमेकांना आधार द्यावा आणि आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन संघर्ष करावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेंदुर्जन येथे आयोजित दुष्काळ संघर्ष यात्रेच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

१४ नोव्हेंबरपासून सुरू झालेली दुष्काळ संघर्ष यात्रा शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, विद्यार्थी आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काढण्यात आली आहे. या यात्रेचा उद्देश केवळ गावोगावी जाऊन भाषणे करणे नसून दुष्काळामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देणे, त्यांचे मनोबल वाढवणे आणि न्याय्य हक्कांसाठी लढण्याची ताकद निर्माण करणे हा आहे, असे तुपकर यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी आत्महत्यांचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील एका महिन्यात विदर्भात १५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत केली नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी संकटाच्या काळात निराश होऊ नये. आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत, तर एकमेकांच्या पाठीशी उभे राहून संघर्ष केल्यानेच मार्ग निघू शकतो, असे ते म्हणाले.

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर तुपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमचेच पैसे शासनाकडे बाकी असताना त्यातील पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांवर उपकार केल्यासारखे दाखवले जात आहे. या मदतीतून शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. एका हेक्टरसाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च येतो. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मजुरीचा हिशेबही धरलेला नाही. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणींची थट्टा असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. जवान आणि शेतकरी यांच्या योगदानावर देशाची व्यवस्था उभी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाचार बनवण्याऐवजी त्यांना सन्मानाने जगता येईल, अशी मदत आणि न्याय मिळायला हवा. पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. आपण एकजुटीने उभे राहिलो नाही, तर शासन आपल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणार नाही, असेही तुपकर यांनी सांगितले.

या दुष्काळ संघर्ष यात्रेचा प्रारंभ मलकापूर येथील शहीद संजयसिंग राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन करून झाला. शहीद जवानाच्या वीरपत्नी सुषमाताई राजपूत यांच्या हस्ते संघर्ष यात्रा रथाचे पूजन करण्यात आले आणि हिरवी झेंडी दाखवून यात्रेला सुरुवात झाली. मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या भागांतून ही यात्रा मार्गक्रमण करत आहे.

ही यात्रा पुढे चिखली तालुक्यात दाखल होणार असून, ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बुलढाणा येथे पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता दुष्काळ एल्गार महामोर्चाला सुरुवात होणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.

शेंदुर्जन येथील या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, सहदेव लाड, राम कदम, विनायक सरनाईक, ईश्वर पाटील, शर्वरी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमेश शेजूळ, माजी सभापती अनिल तुपकर, संतोष शिंगणे, नकुल शिंगणे आणि विनायक राठोड यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी दिनकरराव देशमुख आणि शर्वरी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन माजी सरपंच नथ्थु शिंगणे यांनी केले, तर आभार ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी मानले.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न, दुष्काळ, शेती, बाजारभाव आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्यांसाठी Katta News ला भेट द्या. 👉 https://kattanews.in/

Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!

🟢 WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

हेही वाचा

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मुख्यमंत्री पशुसंवर्धन ग्रामीण योजनेच्या वेबसाइटवरील तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन अर्ज करताना शेतकरी त्रस्त

2 GB डेटा संपला, तरी वेबसाइट सुरू होईना! मुख्यमंत्री पशुसंवर्धन ग्रामीण योजनेचा बोजवारा; ऑनलाइन अर्जातील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त

मेहकरच्या साडेपाच हजार कोटींच्या निधीची CID चौकशी करण्याची सुबोध भाऊ सावजी यांची मागणी

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानंतर मेहकरमध्ये नवा राजकीय वाद! साडेपाच हजार कोटींच्या निधीची CID चौकशी करा; सुबोध भाऊ सावजी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डोणगाव परिसरात कथित बोगस डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी

डोणगाव परिसरात ‘बोगस डॉक्टरांचा’ सुळसुळाट? अधिकृत पदवीविनाच नावापुढे ‘डॉ.’; प्रमाणपत्रांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी

सिंदखेडराजा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी पेरणी घटलेले शेत

सिंदखेडराजा तालुक्यात रब्बीचा पेरा ८० टक्क्यांनी घटला! केवळ ७,७९० हेक्टरवर पेरणी; दुष्काळामुळे शेतकरी हतबल

मेहकर दौऱ्यादरम्यान डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवर रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया

मेहकर दौऱ्याआधी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले पोलिसांच्या ताब्यात; मोर्चाचे बॅनरही हटवले, रविकांत तुपकरांचा आरोप!

नांद्राकोळी येथे अवैध सावकारीविरोधात शेकडो सावकारग्रस्तांचे जनजागृती आंदोलन

नांद्राकोळीत शेकडो सावकारग्रस्तांचा एल्गार! अवैध सावकारीविरोधात जनआंदोलन

Leave a comment