हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

राहुल बोंद्रे यांना बदनाम करण्याचा डाव? काँग्रेसच्या आरोपांनी बुलढाण्यात खळबळ

On: June 17, 2026 10:58 AM
Follow Us:
राहुल बोंद्रे यांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात काँग्रेसचे आंदोलन

बुलढाणा |विशाल गवई 

परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे राजकीय दबावातून आणि वैयक्तिक सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा गंभीर आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीने बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत संबंधित गुन्हे तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.

जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी यावेळी प्रशासनावर टीका करत सांगितले की, परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि राहुल बोंद्रे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संस्थेच्या कार्याला धक्का पोहोचविण्यासाठी आणि सामाजिक प्रतिमा मलिन करण्यासाठी काही व्यक्तींनी राजकीय आकसातून तक्रारी दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

जयस्तंभ चौकातून निघालेल्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात विश्वस्तांवरील दाखल गुन्हे तात्काळ रद्द करण्यासह शासनाची दिशाभूल करणाऱ्या तक्रारदारांवर आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेसच्या निवेदनानुसार, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेली परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था गेल्या ३३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे. अशा संस्थेच्या विश्वस्तांवर कोणतीही निष्पक्ष चौकशी न करता गुन्हे दाखल करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संस्थेशी संबंधित प्रमाणपत्रे चिखली तहसील कार्यालय, नगरपालिका आणि सावरगाव डुकरे ग्रामपंचायतीकडून विधिवत जारी करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित अभिलेखांमध्ये त्यांची नोंद उपलब्ध असल्याचेही नमूद करण्यात आले. तसेच तत्कालीन सरपंचांनी प्रतिज्ञापत्राद्वारे प्रमाणपत्रे दिल्याचे मान्य केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

संस्थेची बाजू न ऐकता एकतर्फी अहवाल तयार करून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. शासन, पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेची दिशाभूल करणाऱ्या तक्रारदारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान ‘राहुल भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’, ‘हे सरकार आमसे डरती है, पोलीस को आगे करती है’, ‘बहुजनांच्या आधारवड राहुल भाऊ’, ‘आय सपोर्ट राहुल भाऊ’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक या आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी प्रकाश पाटील अवचार, ॲड. हरिश रावळ, रशिदखा जमादार, दत्ता काकस, देवानंद पवार, कासम गवळी, भूषण मापारी, डॉ. मोहमद इसरार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खोटे गुन्हे रद्द न झाल्यास जिल्हाभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


आपले मत नक्की कळवा

या प्रकरणाबाबत आपले मत काय आहे? विश्वस्तांवरील कारवाई योग्य की राजकीय दबावातून प्रेरित? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.


Related News

  • बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग; विविध पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप
  • शैक्षणिक संस्थांशी संबंधित प्रकरणांमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले
  • काँग्रेसकडून प्रशासनाविरोधात आंदोलनाची चेतावणी
  • राहुल बोंद्रे यांच्या समर्थनार्थ जिल्हाभरातून प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठ आणि श्री प्रल्हाद महाराज संस्थान येथे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त उपस्थित भाविक

साखरखेर्ड्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात; श्री प्रल्हाद महाराज संस्थान व श्री पलसिद्ध महास्वामी मठात हजारो भाविकांची उपस्थिती

बुलढाणा येळगाव धरण 75 टक्के भरले

बुलढाणेकरांसाठी मोठा दिलासा! येळगाव धरण 75% भरले; पाणीटंचाई दूर होण्याची चिन्हे

सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पाऊस

सिंदखेडराजा तालुक्यावर वरुणराजाची दमदार बरसात; शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक १२५.५० मिमी पाऊस

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे पोलिसांची कारवाई

मेहकर तालुक्यात मोठी कारवाई; देऊळगाव साकर्शा येथे १ क्विंटल २६ किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

खर्चिक विवाहांवर पुरुषोत्तम खेडेकर यांची परखड भूमिका

श्रीमंतीचा माज की समाजाचा ऱ्हास? खर्चिक विवाहांवर पुरुषोत्तम खेडेकरांचा घणाघात

खामगावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियात शाखा व्यवस्थापक आणि कृषी अधिकाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल

खामगावात बँक व्यवस्थापक व कृषी अधिकाऱ्याला मारहाण; स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार यांच्यावर गुन्हा

Leave a Comment