हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

हे धाडस नाही, ही मजबुरी आहे! बाप आजारी म्हणून ई-पीक नोंदीसाठी १४ वर्षांचा मुलगा रात्री शेतात

On: January 28, 2026 7:48 AM
Follow Us:
आजारी बापासाठी ई-पीक नोंदीसाठी रात्री शेतात उतरलेला १४ वर्षांचा शेतकरी मुलगा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा | २७ जानेवारी २०२६

ई-पीक नोंद, शेतकरी योजना, शासन मदत या शब्दांच्या पलीकडे जाऊन शेतकरी कुटुंबांच्या वास्तवावर बोट ठेवणारी एक हृदयद्रावक घटना सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव शिवारात समोर आली आहे.
आजारी बाप अंथरुणाला खिळलेला असताना, अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने ई-पीक नोंदीसाठी रात्री अंधारात शेतात उतरावे लागणे हे धाडस नसून व्यवस्थेचे अपयश असल्याचे बोलले जात आहे.शेतकरी जनार्धन साहेबराव नागरे हे गंभीर आजारामुळे एकाच ठिकाणी खिळले आहेत. कुटुंबाची संपूर्ण शेती जबाबदारी त्यांच्या अल्पवयीन मुलावर येऊन पडली आहे.
शिक्षणाच्या वयात असलेला आदित्य जनार्धन नागरे हा मुलगा शाळेची पुस्तके बाजूला ठेवून बापाच्या जागी उभा राहिला आहे.

२४ जानेवारी २०२६ ही ई-पीक पेरणी नोंदीची शेवटची तारीख होती. दिवसा ई-पीक साईट बंद असल्याने, रात्री साधारण ११ वाजता आदित्यने जीव मुठीत धरून गट क्रमांक १२५, १२८ व २१३ मधील गहू व हरभरा पिकांची ई-पीक नोंद केली.

२५ जानेवारी २०२६ रोजी ई-पीक साईट पूर्णपणे बंद झाल्याने मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जर त्या रात्री ही नोंद झाली नसती, तर भविष्यात अतिवृष्टी, गारपीट किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून कोणतीही मदत मिळण्याचा मार्गच बंद झाला असता.

विशेष म्हणजे, या परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याची माहिती असतानाही, कोणतेही संरक्षण नसताना अंधारात शेतात उतरणे हे धाडस नसून व्यवस्थेची मजबुरी असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

त्या रात्री आदित्यने केलेली ई-पीक नोंद ही वेदनादायक असली तरी, ती शेतकरी कुटुंबाच्या उद्याच्या आधारासाठी केलेली शेवटची धडपड होती.
आज हा प्रश्न एका मुलाचा असला, तरी उद्या तो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांचा प्रश्न ठरू शकतो.

यामुळे परिसरातील शेतकरी ठामपणे मागणी करत आहेत की, ई-पीक पेरणीची नोंद राज्य सरकारने स्वतः करावी, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याच्या पोराला शिक्षणासोबत शेतीची जबाबदारी अंधारात, भीतीत आणि मजबुरीत उचलावी लागू नये.

ई-पीक नोंदीची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वतः घेतल्यास अशा वेदनादायक घटना टाळता येतील, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


हे पण वाचा.


📢 वाचकांसाठी आवाहन :
ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शेतकरी कुटुंबांचे वास्तव शासनापर्यंत पोहोचेल.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथे महावितरणच्या वीज लाईनमुळे १ एकर गव्हाचे पीक जळून खाक

महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका! वरोडी येथे विधवा शेतकरी महिलेचा १ एकर गहू जळून खाक

मानोरा तालुक्यात मेरी पॉलिसी मेरे हाथ उपक्रमात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेबाबत मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! मानोरा तालुक्यात “मेरी पॉलिसी मेरे हाथ” उपक्रम; पिक विमा व पशुधन विम्याबाबत मार्गदर्शन

Maharashtra Weather Alert heavy rain forecast by Punjabrao Dakh from 17 to 20 March

Maharashtra Weather Alert : 17 ते 20 मार्च राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांचा इशारा

Short circuit causes wheat crop fire in Mera Budruk village Chikhli farmers controlling the fire

चिखली तालुक्यात धक्कादायक घटना! शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला आग; शेतकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला 30 एकर पिकाचा पट्टा

पांगरी काटे येथील संकेत इंगळे यांची TA Army मध्ये निवड

बस चालकाच्या मुलाची मोठी कामगिरी! पांगरी काटे येथील संकेत इंगळे ‘TA Army’ मध्ये निवड

साखरखेर्डा सोलारपंप योजना गोंधळामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले

मागेल त्याला सोलारपंप योजनेचा बोजवारा! ऑनलाईन अर्जाच्या गोंधळात साखरखेर्ड्यात शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले

Leave a Comment