हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

हवामान बदलावर पंजाब डख यांचं स्पष्ट भाकीत — शेतकऱ्यांनी पीकनियोजन आत्ताच बदला

Follow Us:
पंजाब डख किनगाव राजा येथे हवामान बदलावर व्याख्यान देताना

निमित्त होतं लोकशिक्षण संस्थेचे सचिव आणि जिजामाता ग्रीन एनर्जी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते गणेशराव राजे जाधव यांच्या वाढदिवसाचं. या कार्यक्रमात आयोजित जाहीर व्याख्यानाला परिसरातील शेतकरी, युवक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तोताराम कायंदे होते, तर माजी खासदार सुखदेव काळे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, ह.भ.प. काळे महाराज, ह.भ.प. काशिनाथ महाराज हरकळ, डॉ. शिवाजी खरात यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पंजाब डख यांनी व्याख्यानात २०२६ ते २०५० या कालावधीत पावसाचे बदलते स्वरूप, जलव्यवस्थापनाची गरज आणि दीर्घकालीन पीकपद्धतीबाबत सविस्तर मांडणी केली. गावरान आंबा-लिंबोळीसारख्या पारंपरिक निसर्गसंकेतांमागचं वैज्ञानिक तर्कशास्त्रही त्यांनी उलगडलं, तसंच गारपीट व अवकाळी पावसाचा शेतीवर होणारा परिणामही स्पष्ट केला.

कापूस व अन्य शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त करत डख म्हणाले, “जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही, तोपर्यंत त्याला न्याय्य भाव आणि सन्मान मिळणे कठीण आहे.” शेतकऱ्यांनी एकजुटीने उभं राहण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

प्रास्ताविकात ज्ञानेश राजे जाधव यांनी गणेशराव राजे जाधव यांच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. उत्तरादाखल बोलताना गणेशराव राजे जाधव यांनी जिजामाता ग्रीन एनर्जी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना आर्थिक बळ देण्याची आणि सहकार चळवळ बळकट करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाला शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळाजी सोसे, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ऋषिकेश देशमुख यांनी मानले.

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्या राजकीय वक्तव्यांची चर्चा

‘माझ्याकडे हरामाचा पैसा नाही’; वाढदिवसाच्या रॅलीवरून संजय गायकवाडांचा श्वेता महालेंना टोला!

मोताळ्यात 1 किलो 170 ग्रॅम गांजा जप्त

मोताळ्यात गांजा विक्रीवर पोलिसांचा छापा; 58 हजारांचा गांजा जप्त, 19 वर्षीय आरोपी अटकेत

समृद्धी महामार्गावर डोणगावजवळ कारचा अपघात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारचालकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मलकापूरच्या जवानाला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मलकापूरच्या जवानाचा कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू; ४२ राऊंडची सलामी देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

बुलढाण्यात श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यातील राजकीय वाद

बुलढाण्यात शिवसेना-भाजप वाद पुन्हा चव्हाट्यावर; संजय गायकवाडांचा श्वेता महालेंना इशारा, म्हणाले, “बाप कोण हे योग्य वेळी दाखवून देऊ!”

बुलढाणा रुग्णालय आरोपी फरार भुसावळ अटक

बुलढाणा रुग्णालयातून लघुशंकेच्या बहाण्याने पळाला आरोपी; अवघ्या ६ तासांत भुसावळात पोलिसांच्या ताब्यात

Leave a Comment