सिंदखेडराजा | प्रा. दिलीप नाईकवाड
सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणूक मतमोजणी आज सकाळी सुरू होत असून 85 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 अंतर्गत
दिनांक 2 व 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि सिंदखेडराजा येथे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वाखाली
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या राबविण्यात आली.
सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत एकूण 21 मतदान केंद्रांवर
10 प्रभागांसाठी 20 नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाले.
यामध्ये विक्रमी 85.08 टक्के मतदान नोंदविण्यात आले.
मतमोजणीपूर्वी निवडणूक प्रशासन व पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील 11 पालिका मतमोजणी केंद्रांवर
तगडा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
सिंदखेडराजा पोलीस निरीक्षक आशिष इंगळे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी
मतमोजणीसाठी राबविण्यात आलेल्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजनांची माहिती
निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिली.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता EVM स्ट्रॉंग रूम उघडण्यात येईल.
- सकाळी 10 वाजता नगरपरिषद सभागृहात मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल.
- नगराध्यक्ष उमेदवारांना 4 तर नगरसेवक उमेदवारांना 1 मतमोजणी प्रतिनिधी परवानगी.
- एकूण 4 टेबलांवर टप्प्याटप्प्याने सर्व 10 प्रभागांची मतमोजणी.
- नगराध्यक्ष पदाची मतमोजणी सर्व प्रभागांसोबत एकत्रित होणार.
सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे,
असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे पण वाचा..
👉 ताज्या निवडणूक बातम्यांसाठी आमच्यासोबत राहा
Kattanews.in वर मिळवा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व स्थानिक, राजकीय व ब्रेकिंग अपडेट्स सर्वात आधी.
🔗 हे पण वाचा…
















