हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मतमोजणीसाठी जिल्ह्यासह सिंदखेडराजात कडेकोट बंदोबस्त; 85% मतदानानंतर आज निकालाकडे लक्ष

On: December 21, 2025 7:31 AM
Follow Us:
सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणूक मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

सिंदखेडराजा | प्रा. दिलीप नाईकवाड

सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणूक मतमोजणी आज सकाळी सुरू होत असून 85 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 अंतर्गत
दिनांक 2 व 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि सिंदखेडराजा येथे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वाखाली
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या राबविण्यात आली.

सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत एकूण 21 मतदान केंद्रांवर
10 प्रभागांसाठी 20 नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाले.
यामध्ये विक्रमी 85.08 टक्के मतदान नोंदविण्यात आले.

मतमोजणीपूर्वी निवडणूक प्रशासन व पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील 11 पालिका मतमोजणी केंद्रांवर
तगडा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती दिली.

सिंदखेडराजा पोलीस निरीक्षक आशिष इंगळे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी
मतमोजणीसाठी राबविण्यात आलेल्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजनांची माहिती
निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिली.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता EVM स्ट्रॉंग रूम उघडण्यात येईल.
  • सकाळी 10 वाजता नगरपरिषद सभागृहात मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल.
  • नगराध्यक्ष उमेदवारांना 4 तर नगरसेवक उमेदवारांना 1 मतमोजणी प्रतिनिधी परवानगी.
  • एकूण 4 टेबलांवर टप्प्याटप्प्याने सर्व 10 प्रभागांची मतमोजणी.
  • नगराध्यक्ष पदाची मतमोजणी सर्व प्रभागांसोबत एकत्रित होणार.

सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे,
असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे पण वाचा..

‘ऑन ड्यूटी’ पोलिसावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला! कर्तव्यावर जातानाच बेदम मारहाण; बुलढाणा बसस्थानक हादरले.

👉 ताज्या निवडणूक बातम्यांसाठी आमच्यासोबत राहा

Kattanews.in वर मिळवा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व स्थानिक, राजकीय व ब्रेकिंग अपडेट्स सर्वात आधी.


 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

श्वेता महाले संजय गायकवाड वाद बुलढाणा राजकारण

श्वेता महाले-संजय गायकवाड वाद पुन्हा पेटला, इंस्टाग्राम व्हिडिओतून थेट चिमटा ‘रावण बनकर आओगे तो…’

शिवदास रिंढे बुलढाणा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस फेरनिवड

शिवदास रिंढे यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी फेरनिवड

श्वेता महाले संजय गायकवाड वाद बुलढाणा भाजप शिवसेना

‘लहान मुलगा इकडे, बायको तिकडे, मोठा मुलगा तिकडे…’ ‘तुम्ही शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार?’ श्वेता महालेंचा संजय गायकवाडांवर थेट निशाणा

Leave a Comment