हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

On: March 17, 2026 6:38 PM
Follow Us:
मेहकर पालिकेचा शासकीय जमीन गैरवापर घोटाळा आणि 1.87 कोटी वसुली आदेश

मेहकर | १७ मार्च २०२६ 

मेहकर नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. मेहकर येथील जानेफळ रोडवरील शेत सर्वे नंबर १५ मधील जमिनीवर न्यायालयाने तात्पुरता मनाई हुकूम दिल्यानंतरही बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, काही कर्मचारी तसेच ठाणेदार यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप झाला असून न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावून जाब विचारला आहे. या घटनेमुळे मेहकर शहरात मोठी चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर येथील गुलाम मोहंमद राज मोहंमद आणि त्यांच्या चार नातेवाइकांच्या मालकीची जानेफळ रोडवरील शेत सर्वे नंबर १५ मधील ६२ आर वडिलोपार्जित जमीन आहे. या जागेवर मेहकर नगरपालिकेने विकासाच्या नावाखाली व्यापारी गाळे बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप जमीनमालकांनी केला आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या प्रकरणी जमीनमालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी कोणतेही बांधकाम करू नये असा ‘जैसे थे’ तात्पुरता मनाई हुकूम दिला होता. मात्र, १३ मार्च रोजी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांच्या उपस्थितीत या ठिकाणी बांधकाम सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सुरू असलेले बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला असता मुख्याधिकारी राम कापरे, विशाल शिरपूरकर, शे. जफर शे. करीम, अनिल रामदास मुळे, सय्यद अख्तर, प्रदीप बुंधे आणि मेहकरचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांना न्यायालयाचा मनाई हुकूम दाखविण्यात आला. तरीदेखील त्यांनी आदेश मानण्यास नकार देत काम सुरूच ठेवले, असा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात गुलाम मोहंमद यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे मेहकर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

याबाबत मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, संबंधित ठिकाणी सुरू असलेले बांधकाम मेहकर नगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या जागेवर सुरू आहे. तक्रारकर्त्याने तक्रार करण्यापूर्वीच या ठिकाणी बांधकाम सुरू होते आणि ज्या जागेवर काम थांबवण्याची मागणी केली जात आहे ती जागा मेहकर नगरपालिकेच्या मालकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


📢 वाचकांसाठी आवाहन

अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्या, ब्रेकिंग अपडेट्स आणि सरकारी निर्णयांची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी Kattanews.in नियमित भेट द्या आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.


📌 संबंधित बातम्या

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment