मलकापूर (प्रतिनिधी) |१२ मार्च २०२६
दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची असलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने राज्य सचिव कलीम शेख यांनी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदन देत प्रकरणे निकाली काढण्याची मागणी केली.
निवेदनात पुढे सांगण्यात आले की, 31 मार्च नंतर लाभार्थ्यांना पुन्हा उत्पन्न दाखले सादर करावे लागतात. त्यामुळे दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार चव्हाण हे खाजगी कारणामुळे रजेवर असल्याचे कार्यालयाकडून समजले. त्यामुळे त्यांचा प्रभार ज्यांच्याकडे देण्यात आला आहे, त्यांना प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती कलीम शेख यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी तातडीने प्रभारी नायब तहसीलदार चौधरी मॅडम यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून 21 मार्चपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. यावेळी दिव्यांग संघटनेचे कलीम शेख, इमरान शेख आणि जाफर खान यांनी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांचे आभार मानले.
Related News
- मागासवर्गीय शेतकरी व महिलांसाठी सुवर्णसंधी! 5 HP मोटार पंप व शिलाई मशीन 100% अनुदानावर
- दिव्यांगांसाठी नवीन शासकीय योजना जाहीर
- अण्णाभाऊ साठे महामंडळ थेट कर्ज योजना : मातंग समाजासाठी 1 लाखांपर्यंत कर्ज, 29 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू
Call To Action
ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. आपल्या परिसरातील बातम्या व अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे पोर्टल फॉलो करा.












