हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

निजामपूरचे नाव बदलणार? ‘श्रीरामपूर’ करण्याची भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांची मोठी मागणी

Follow Us:
भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांनी निजामपूर गावाचे नाव बदलून श्रीरामपूर करण्याची मागणी केली

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी |१० मार्च २०२६ 

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते लखनसिंह ठाकुर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन केली आहे. या मागणीमुळे तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

रिसोड शहरालगत असलेले मौजे निजामपूर हे गाव निजाम काळापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली असली तरी गावाचे नाव अजूनही ‘निजामपूर’ असेच असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या संदर्भात ग्रामपंचायत निजामपूरनेही एकमताने ग्रामसभेत ठराव मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे. गावातील नागरिक, तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य जनतेनेही या नावबदलाला सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांनी मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन निजामपूर गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रतिलिपी प्रधान सचिव (महसूल), विभागीय आयुक्त अमरावती आणि जिल्हाधिकारी वाशिम यांनाही देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. आता शासन स्तरावर या मागणीवर कोणता निर्णय घेतला जातो याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


📢 Kattanews.in वाचकांसाठी

तुमच्या परिसरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडी सर्वात आधी वाचण्यासाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.


🔎 Related News

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२७ पाहताना महाराष्ट्रातील विद्यार्थी

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! पाहा, परीक्षा कधीपासून सुरू होणार

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

Leave a Comment