हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्ड्यात महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; “स्त्री शक्तीचा सन्मान हीच खरी ओळख” – वर्षाताई उगलमुगले

On: March 10, 2026 11:27 AM
Follow Us:
साखरखेर्डा येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

साखरखेर्डा | १० मार्च २०२६

जागतिक महिला दिनानिमित्त साखरखेर्डा येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. यावेळी बोलताना जागदरी येथील आदर्श महिला सरपंच सौ. वर्षाताई शंकरराव उगलमुगले यांनी “स्त्री शक्तीचा सन्मान हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे” असे प्रतिपादन केले.

प्रत्येक महिलांच्या यशस्वी कामगिरीमागे पुरुषांचा सहभाग असतो, त्याचप्रमाणे पुरुषांच्या यशामागे महिलांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो. महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे वर्षाताई उगलमुगले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले.

या कार्यक्रमाला साखरखेर्डा येथील सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर, माजी सरपंच सौ. पुनम महेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी दिनकरराव राठोड, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष प्रतापराव मोरे, शंकरराव उगलमुगले, डॉ. गोपाल परिहार, जिल्हा सचिव डी. एन. पांचाळ, औषध निर्माता डॉ. गोपाल मानतकर आदी उपस्थित होते.

महिलांना घरकाम सांभाळत सामाजिक, राजकीय आणि आरोग्य सेवेत मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिक्षण, आरोग्य, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स म्हणून कार्य करताना अनेक अडचणी येतात, मात्र त्या न डगमगता आपले कर्तव्य पार पाडतात. अशा महिलांचा सन्मान झाल्यास त्यांना काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन सरपंच सौ. ज्योती जाधव यांनी केले.

यावेळी आरोग्य सेविका प्रमिला कोवे, आशा वर्कर्स ज्योती दिलीप इंगळे आणि डॉ. वैष्णवी राठोड यांनी मनोगत व्यक्त करताना कोरोना काळात केलेल्या कार्याची समाजाने दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली. मात्र अशा सन्मान सोहळ्यांमुळे आपल्या कार्याची योग्य दखल घेतली जाते आणि समाजात काम करण्यासाठी प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनानिमित्त साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर, वर्षाताई शंकरराव उगलमुगले, सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, माजी सरपंच सौ. पुनम महेंद्र पाटील, डॉ. वैष्णवी राठोड, डॉ. निलीमा देशमुख, डॉ. जयश्री शेळके, प्रमिला माधवराव कोवे, शांता सुखदेव वाघ, कविता विठोबा इंगळे, ज्योती दिलीप इंगळे, शिला सुधिर इंगळे, दिपाली सुपाजी पिठलोड, अस्मिता दिनकर पारधे, पूजा अशोक चव्हाण, मिनाक्षी भरत गवई, स्वाती बाबूराव डोंगरदिवे, मिना काशिनाथ बिडवे, सिद्धुबाई गाडेकर, ज्योती सुरेश चांगाडे, पुनम ज्ञानेश्वर सरकटे, वैशाली रविंद्र गवई, दिपाली विशाल डोळे, एन. आर. झिने, जे. डी. काळे, रेखा खिल्लारे आणि छाया संतोष गोडाले यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे, सचिव डी. एन. पांचाळ, प्रसिद्धी प्रमुख समाधान सरकटे आणि राधेश्याम बंगाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खंडारे यांनी केले.


👉 वाचा संबंधित बातम्या


📢 KattaNews.in वर आपल्या भागातील बातमी प्रसिद्ध करा

आपल्या गावातील समस्या, सामाजिक उपक्रम, अपघात, गुन्हे किंवा विशेष बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा.

WhatsApp News Tip : आपल्या भागातील बातमी आम्हाला पाठवा.

KattaNews.in – तुमच्या परिसरातील विश्वासार्ह बातम्या

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

Leave a Comment