हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मागासवर्गीय शेतकरी व महिलांसाठी सुवर्णसंधी! 5 HP मोटार पंप व शिलाई मशीन 100% अनुदानावर

On: January 4, 2026 4:46 PM
Follow Us:
मागासवर्गीय शेतकरी व महिलांसाठी 5 HP मोटार पंप व शिलाई मशीन 100 टक्के अनुदान योजना बुलढाणा जिल्हा परिषद

समाधान सरकटे/प्रतिनिधी 

बुलढाणा : मागासवर्गीय शेतकरी व महिलांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत समाजकल्याण विभागाच्या 20 टक्के सेसफंड योजनेतून मागासवर्गीय शेतकरी व महिलांसाठी 100% अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय शेतकरी व महिलांसाठी 5 HP क्षमतेचा विद्युत मोटार पंप तसेच मागासवर्गीय महिलांसाठी शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहे. अधिकाधिक मागासवर्गीय शेतकरी व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.ही योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत असून, यासाठी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

योजनेसाठीचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात आले असून, सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे.

मागासवर्गीय शेतकऱ्यांनी 5 HP विद्युत मोटार पंप योजनेसाठी, तर मागासवर्गीय महिलांनी शिलाई मशीन योजनेसाठी आपले अर्ज संबंधित पंचायत समिती कार्यालयातील गट विकास अधिकारी यांच्याकडे 15 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावेत.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी पात्र लाभार्थ्यांना आवाहन केले असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन व जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रमोद यंडोले यांनी अधिक माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

👉 असा करा अर्ज

  • जवळच्या पंचायत समिती कार्यालयातून अर्ज घ्या
  • आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा
  • 15 जानेवारी 2026 पूर्वी अर्ज सादर करा

📌 महत्वाची सूचना: अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

हे पण वाचा..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

भूमिहीन अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबांसाठी मोफत शेतजमीन योजना

भूमिहीनांना मोफत शेतजमीन! अनुसूचित जाती, नवबौद्ध कुटुंबांसाठी मोठी संधी; ५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव द्या

बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचे पैसे थेट खात्यात जमा होणार; 10.78 कोटींचा निधी मंजूर

लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्ट हप्ता 2026 अपडेट

लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठी अपडेट! जुलै-ऑगस्टचा ₹3,000 हप्ता कधी मिळणार? e-KYC बाबतही महत्त्वाची माहिती

Namo Shetkari Yojana 2000 Installment Update Katta News

Namo Shetkari Yojana : ₹२००० चा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार; राज्य शासनाचा मोठा निर्णय, पहा संपूर्ण माहिती!

₹10 आणि ₹20 च्या पॉलिमर प्लास्टिक नोटांच्या फील्ड ट्रायलची माहिती

₹10 आणि ₹20 च्या नोटांबाबत मोठी बातमी! आता प्लास्टिकच्या नोटा येणार? केंद्राची मंजुरी

बुलढाणा जिल्ह्यातील 34,855 शेतकऱ्यांच्या खात्यात 295.47 कोटी रुपये जमा

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 34,855 खात्यांत 295.47 कोटी रुपये जमा

Leave a Comment