हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोडमध्ये अवैध सावकारीवर मोठी धडक कारवाई! दोन ठिकाणी झडती; कागदपत्रे जप्त, चौकशी सुरू

On: March 11, 2026 7:53 PM
Follow Us:
रिसोडमध्ये अवैध सावकारीविरोधात सहकार विभाग व पोलिसांची कारवाई

रिसोड | प्रतिनिधी | ११ मार्च २०२६

रिसोड तालुक्यात अवैध सावकारी व्यवहारांवर लगाम घालण्यासाठी सहकार विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त धडक कारवाई करत मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत ही झडती कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने दिली.

सहकार विभागाकडे रिसोड तालुक्यात अवैध सावकारी व्यवहारांविषयी दोन तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानुसार श्री. सचिन गणराजअप्पा गांजरे (रा. छत्रपती शिवाजी चौक, रिसोड) तसेच श्री. सुधाकर किसन टेकाळे (रा. चिखली, ता. रिसोड, जि. वाशिम) यांच्या ठिकाणी सहकार विभाग आणि पोलिस विभागाच्या दोन पथकांमार्फत ६ मार्च २०२६ रोजी झडती कारवाई करण्यात आली.या कारवाईदरम्यान पुढील चौकशीसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी सावकारी कायद्याअंतर्गत पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

ही कारवाई जिल्हाधिकारी वाशिम योगेश कुंभेजकर आणि पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.

या कारवाईमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रिसोड गजानन फाटे, सहाय्यक निबंधक (प्रशासन) आर. आर. सावंत, सहाय्यक निबंधक एम. डी. कच्छवे, सहाय्यक निबंधक पी. टी. सरकटे, सहकार अधिकारी एस. एस. पाटील, जे. एस. सहारे, मुख्य लिपिक पी. आर. वाडेकर तसेच सहकार विभाग, पोलिस विभाग आणि महसूल विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या परिसरात अवैध सावकारी व्यवहार सुरू असल्याची माहिती सहकार विभागाला गोपनीय पद्धतीने द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.


Related News


हे आवश्यक करा..

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या, गुन्हेगारी घडामोडी आणि स्थानिक अपडेट्ससाठी Kattanews.in नियमित वाचा. ही बातमी शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा.

 

विजय जुंजारे

विजय जुंजारे हे रिसोड प्रतिनिधी असून वाशिम जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींचे कव्हरेज करतात.त्यांना २ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवतात. त्यांच्या बातम्या वाचकांना विश्वासार्ह आणि नेमकी माहिती देतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a Comment